Artificial Rain
पाणी हे जीवन आहे.पृथ्वीचा ७३ टक्के हिस्सा पाण्याने व्यापला आहे परंतु त्यातील फक्त २ ते २.५ टक्केच पाणी मानवासाठी आणि शेतीसाठी उपयोगी आहे.तसेच या पाण्याचा सर्वात मोठा स्त्रोत हा पाऊस आहे.कधी जास्त पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते.तर कधी कधी पाऊस न झाल्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो.अशा वेळी शेतकऱ्यांची शेतीमधील आशाच कोमेजून जाते.
परंतु काही देशांनी नैसर्गिक पावसालाच चॅलेंज दिले आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाच्या रहस्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.चीन आणि दुबईसारख्या देशांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कृत्रिम पाऊस(Artificial Rain) पडण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.या प्रयोगामुळे जगभरातील इतर देशांसोबतच भारताची देखील आशा पल्लवित झाली आहे.
चीन आणि दुबई मध्ये क्लाउड सिडींगच्या माध्यमातून कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.तर हे क्लाउड सिडींग म्हणजे काय?ते कसे कार्य करते?आणि याचा भारतासाठी कसा फायदा होऊ शकतो? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहेत.त्यासाठी सदरचा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक आहे.
क्लाउड सिडिंग काय असते?
क्लाउड सिडिंग म्हणजे पावसाच्या ढगांवर खास रसायने फवारून त्यांना पाऊस पडण्यास प्रवृत्त केले जाते.या रसायनांमुळे ढगांमधील पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांना एकत्र करून ते मोठे होण्यास मदत केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.यामध्ये वापरली जाणारी रसायने ही विमानाच्या सहाय्याने ढगांच्या वरून फवारली जातात.या रसायांमध्ये प्रामुख्याने सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड आणि ड्राय आईस यांचा वापर केला जातो.
चीन आणि दुबई मधील कृत्रिम पाऊस
चीन आणि दुबई या देशांनी कृत्रिम पावसाचे केलेले प्रयोग संपूर्ण जगात चर्चेचा विषय आहेत.चीन मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग हा तेथील दुष्काळग्रस्त भागांवर पाऊस पाडण्यासाठी करण्यात आला आहे.तर दुबई सारख्या आखाती देशामध्ये तळ्यांचे पुनर्भरण करण्यासाठी तसेच उन्हाळ्यात तेथील प्रचंड तापमान नियंत्रित करण्यासाठी करण्यात आला होता.दोन्ही देशांमधील कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी झाले असून हा कृत्रिम पाऊस भारतासाठी प्रेरणादायी असणार आहे.
भारतामध्ये कृत्रिम पावसाची आशा
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या,शेतकऱ्यांचे डोक्यावर वाढणारे कर्ज त्यामुळे होणारी निराशा ही सर्व भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस देशातील शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण असणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.भारतामध्ये कानपूर आयआयटी च्या माध्यमातून कृत्रिम पावसाच्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.देशातील विविध भागांमध्ये याचे प्रयोग केले जाणार आहेत.
कृत्रिम पाऊस आणि शेती
भारत हा कृषीप्रधान देश असून शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.शेतीसाठी पाणी खूप आवश्यक आहे त्याशिवाय शेती करणे शक्यच नाही.त्यामुळे कृत्रिम पाऊस हे तंत्रज्ञान दुष्काळी भागातील शेतीसाठी वरदानच असणार आहे.हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दुष्काळाच्या दाढेतून वाचवणारे ठरणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे.तसेच पाण्याचा तुटवडा,कोरडा दुष्काळ,नापिकी यांसारख्या समस्या कायमच्या मिटणार आहेत.
भारतासाठी चॅलेंज आणि भविष्य
कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान हे अजून प्रयोगाच्या अवस्थेत आहे.वातावरणामध्ये होणारे बदल,ग्लोबल वाॅर्मिंग यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.तसेच यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च येणार आहे.या गोष्टींचा देखील विचार होणार असून हे काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत.कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान हे नक्कीच चॅलेंजिंग ठरणारे आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.