नवीन वर्षाच्या स्वागताला मेघराजाची हजेरी,महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार! Todays Havaman Andaj

Spread the love

Todays Havaman Andaj
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी शेवटचेच काही दिवस बाकी आहेत.यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव झाल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे.नोव्हेंबर महिन्यात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

अशातच हवामान विभागाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

भारतीय हवामान संस्थेने सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान तामिळनाडू किनारपट्टी भागांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र,गोवा,मध्य प्रदेश,गुजरात,राजस्थान, उत्तर प्रदेश,पंजाब,हरियाणा,उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार १०० कोटी रुपयांची थकबाकी,पहा संपूर्ण माहिती!

पूर्वेकडून वाहणाऱ्या कमी दाबाच्या हवेमुळे जम्मू आणि काश्मीर,हिमाचल प्रदेश,उत्तराखंड या राज्यांमध्ये पावसासह बर्फवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम मध्य प्रदेश,पश्चिम राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्ली आणि एनसीआर मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment