Onion Outstanding:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार १०० कोटी रुपयांची थकबाकी,पहा संपूर्ण माहिती!

Spread the love

Onion Outstanding
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ भारत लिमिटेड (Nafed) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ भारत लिमिटेड (NCCF) या केंद्रीय संस्थांकडून खरेदी केली जाते.खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाच्या (Onion Outstanding) मोबदल्यात ९० टक्केच रक्कम वितरित केली जाते.तसेच उर्वरित १० टक्के रक्कम अदा करण्यासाठी काही काळाचा विलंब लागतो.

देशातील शेतकऱ्यांनी केंद्राच्या किंमत स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत या दोन केंद्रीय संस्थांना शेतकरी उत्पादक कंपन्याद्वारे कांदे विकले होते.त्यामुळे शेतकऱ्यांची १० टक्के रक्कम या संस्थांकडे प्रलंबित आहे.भारताचे केंद्रिय राज्य मंत्री भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की केंद्रीय ग्राहक व्यवसाय मंत्रालय लवकरच शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले उर्वरित १० टक्के थकबाकी असलेली रक्कम अदा करणार आहे.

शेतकऱ्यांची केंद्रीय ग्राहक व्यवसाय मंत्रालयाकडे १० टक्के प्रलंबित असलेली रक्कम ही १०० कोटी रुपयांच्या घरात आहे.शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ भारत लिमिटेड (Nafed) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ भारत लिमिटेड(NCCF) या दोन केंद्रीय संस्थांकडे प्रलंबित असलेली १० टक्के रक्कम ही तपासणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर वितरित करण्यात येते.ही प्रक्रिया खूप वेळखाऊ असल्याने त्यासाठी विलंब होतो.

हे पण वाचा:- आता एवढे क्षेत्र असेल तरी देखील शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी मिळणार ४ लाख रुपये अनुदान!

राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ भारत लिमिटेड (Nafed) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ भारत लिमिटेड(NCCF) या दोन केंद्रीय संस्थांनी जून २०२३ पासून महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सुमारे ५ लाख टन कांद्याची खरेदी केली होती.या ५ लाख टन कांद्याची किंमत जवळपास १००० कोटी रुपयांच्या घरात होती.त्यामुळे शेतकऱ्यांना १० टक्के प्रलंबित रक्कम म्हणून १०० कोटी रुपयांची थकबाकी लवकरच मिळणार आहे.

केंद्रीय संस्था राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ भारत लिमिटेड (Nafed) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ भारत लिमिटेड(NCCF) यांनी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.त्यासाठी नाफेडच्या माध्यमातून विविध ठिकाणी ३० केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment