आता एवढे क्षेत्र असेल तरी देखील शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी मिळणार ४ लाख रुपये अनुदान! Vihir Anudan Yojana

Spread the love

Vihir Anudan Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.मागील बऱ्याच वर्षांपासून ही योजना राज्यात राबविली जात आहे.राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून विहीर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जमीन क्षेत्र मर्यादा घालण्यात आली होती.यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते.ही बाब सरकरच्या लक्षात आल्याने सरकारने ही अट काही प्रमाणात शिथिल केली आहे.त्यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना विहीर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विहीर अनुदान योजना क्षेत्र मर्यादा
Vihir Anudan Yojana

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते.यासाठी किमान जमीन क्षेत्राची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहत होते.परंतु सरकारने आता किमान जमीन धारणा क्षेत्राची मर्यादा उठविली आहे.शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात बारा उताऱ्यावर स्वामालकीची किमान दीड एकर जमीन असणे आवश्यक होते.परंतु आता सरकारने ही किमान जमीन धारणा मर्यादा एक एकर केली आहे.त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

हे पण वाचा:- आता विहिरीसाठी मिळणार ४ लाख रुपये अनुदान,तुमच्या मोबाईलवरून देखील करता येणार ऑनलाईन अर्ज!

अनुदानाच्या रकमेत देखील वाढ

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतीला सिंचन असणे खूप गरजेचे असते.परंतु सर्वच शेतकऱ्यांना शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करुन देणे अशक्य असल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते.सुरुवातीला या योजनेच्या अंतर्गत सिंचन विहीर खोदण्यासाठी २ लाख रुपये अनुदान दिले जात होते.आता वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे.आता सिंचन विहीर खोदण्यासाठी लाभार्थ्यांना ४ लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.

सामायिक शेतकऱ्यांना देखील मिळणार लाभ

पूर्वी सामायिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना विहीर अनुदानासाठी कोणत्याही एकाच शेतकऱ्याला अनुदान दिले जात होते.परंतु आता नवीन नियमानुसार सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची किमान जमीन धारणा ही एक-एक एकर असेल तर त्यांना देखील वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ मिळणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

सिंचन विहीर खोदण्यासाठी सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ४ लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे अर्ज करायचे आहेत.शेतकरी ऑनलाईन पद्धतीने देखील मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये EGS – Horti हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment