Ayushman Bharat Card Apply:- आता आयुष्मान कार्ड बनवा घरबसल्या तेही फक्त 5 मिनिटात,Apply Now

Spread the love

Ayushman Bharat Card Apply

Ayushman Bharat Card Apply
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे.सदरची योजना ही नागरिकांच्या आरोग्यासंबंधी आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड बनवावे लागते.

आता आयुष्मान भारत कार्ड बनविण्यासाठी नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.सर्वसामान्य नागरिकांना आपले आयुष्मान कार्ड घरबसल्या आपल्या मोबाईलवरून काढता येणार आहे.ते आपल्या मोबाईलवरून कसे काढायचे? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आयुष्मान भारत कार्ड कसे बनवायचे?
Ayushman Bharat Card Apply

१. आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्याला सर्वप्रथम https://beneficiary.nha.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

२.आपल्यासमोर वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला उजवीकडील बॉक्समध्ये लाभार्थी (Beneficiary) नावाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि व्हेरीफाय नावाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

३.आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल तो तुम्हाला टाकायचा आहे.नंतर Captcha कोड टाकून लॉगिन करायचे आहे.

४.लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला राज्याचे नाव,योजनेचे नाव (PMJAY), तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे.नंतर Search By ऑप्शन मध्ये तुम्हाला फॅमिली आयडी पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर फॅमिली आयडी पर्यायामध्ये तुमचा १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे.आणि सर्च पर्यायावर क्लिक करायचे आहे.

५.जर तुमचे कुटुंब आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत पात्र असेल तर तुमच्या समोर कुटुंबातील सर्व सदस्यांची यादी ओपन होईल.Ayushman Bharat Card Apply

६. जर तुमचे कुटुंब आयुष्मान भारत योजनेच्या पात्र नसेल तर कोणताही लाभार्थी सापडला नाही असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

७.आता ज्या व्यक्तीचे आयुष्मान भारत कार्ड बनवायचे आहे त्याच्या नावाच्या समोर दिलेल्या आयकॉन वर क्लिक करायचे आहे.त्यानंतर एक नवीन बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आधार क्रमांकाच्या समोर Verify नावाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

८.आता ज्याचे आयुष्मान भारत कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल.तो OTP टाकायचा आहे.

९.त्यानंतर तुमच्या समोर एक संमती फॉर्म ओपन होईल त्या फॉर्मच्या शेवटी डाव्या बाजूला असलेल्या बॉक्स वरती टिक करायचे आहे आणि बॉक्सच्या उजव्या बाजूला असलेल्या Allow ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

हे पण वाचा:- सरकारद्वारे नागरिकांना मिळणार 5 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार

१०.त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन बॉक्स ओपन होईल जिथे तुम्हाला ऑथेंटीकेट बटणावर क्लिक करायचे आहे. आता नवीन स्क्रीन ओपन होईल जिथे तुम्हाला लाभार्थ्यांचे नाव दिसेल.Ayushman Bharat Card Apply

११.आता बॉक्सच्या खाली तुम्हाला e-kyc आधार OTP नावाचा पर्याय निवडून Verify नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

१२.तुम्हाला आलेला OTP तिथे टाकल्यानंतर तुमच्या समोर एक संमती फॉर्म ओपन होईल जिथे तुम्हाला त्या फॉर्मच्या शेवटी असलेल्या बॉक्सला टिक करायचे आहे आणि उजव्या बाजूला असलेल्या परवानगी बटणावर क्लिक करायचे आहे.तुमच्या समोर लाभार्थ्यांची संबंधित माहिती आणि फोटो ओपन होईल.

१३.आता तुमच्या समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला कॅप्चर फोटो नावाच्या खाली असलेल्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे.आता लाभार्थ्याचा फोटो मोबाईल कॅमेऱ्याच्या साहाय्याने काढायचा आहे आणि पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

१४.तुमच्या समोर असलेल्या पेजवरील अतिरिक्त माहिती तुम्हाला भरायची आहे.फोटोच्या खाली जुळणारा स्कोअर 80 टक्क्यांपेक्षा जास्त करायचा आहे.अशा प्रकारे तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड घरबसल्या डाउनलोड करू शकता.

आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment