Ayushman Card Eligibility
Ayushman Card Eligibility
नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात एक महत्वपूर्ण योजना राबविली जात आहे. सदर योजने अंतर्गत नागरिकांना आरोग्यासाठी 5 लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे.
आयुष्मान भारत असे या योजनेचे नाव आहे. सदर योजनेमध्ये देशातील अनेक नागरिक सहभागी होत आहेत.
या योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत.
जर तुम्हालाही सदर योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला अगोदर तुमची पात्रता तपासावी लागेल.तुम्हाला तुमची पात्रता ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे. जर तुम्ही सदर योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपला अर्ज करू शकणार आहेत.
हे पण वाचा:- हे काम करा अन्यथा बँक खाते होईल बंद
तुमची पात्रता चेक करण्यासाठी खालील प्रोसेस तुम्हाला करावी लागेल.
1)तुमची पात्रता चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.त्यासाठी येथे क्लिक करा.
2)त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.त्या पेज वरील ‘Am I Eligible’ या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
3)तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मोबाईल नंबरचा ऑप्शन दिसेल.तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.नंतर खाली OTP या ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे.
4) आत्ता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.आणि रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
5)सर्वात शेवटी तुम्हाला Search या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.त्यानंतर तुम्ही सदर योजनेकरीता पात्र आहेत किंवा नाही हे तुम्हाला समजणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.