RBI New Rule :- हे काम करा अन्यथा बँक खाते होईल बंद,जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

RBI New Rule

RBI New Rule
नमस्कार मित्रांनो,देशातील प्रत्येक नागरिकांचे कुठल्या ना कुठल्या बँकेत खाते असतेच.अशातच नागरिकांच्या बँक खात्याविषयी भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन नियम लागू केला आहे.आणि त्याचे पालन करणे सर्व खातेधारक व्यक्तींना बंधनकारक असणार आहे.अन्यथा त्यांचे बँक खाते बँकेकडून बंद करण्यात येईल.

RBI चा काय आहे नवीन नियम?


भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने बँक खातेधारक व्यक्तींना त्यांचे KYC अपडेट करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे खाते धारकांनी आपली KYC अपडेट करायची आहे.जे खातेधारक बँकेत जाऊन आपली KYC अपडेट करणार नाहीत अशा खाते धारकांचे खाते बंद करण्यात येणार आहे.

आपण जर आपली KYC अपडेट नाही केली तर आपण बँकेचे कसलेही व्यवहार करू शकणार नाहीत.त्याचबरोबर आपल्याला पैसे देखील काढता येणार नाहीत.बँकेच्या प्रत्येक खाते धारक व्यक्तींसाठी KYC प्रक्रिया ही वेगवेगळी असते.

हे पण वाचा:- केंद्र हे पण वाचा:- केंद्र सरकारची नवी योजना,नागरिकांना मिळणार दरमहा 10 हजार रुपये

भारतीय रिझर्व्ह बँकेने 29 मे 2019 रोजी एक परिपत्रक काढले होते त्यानुसार बँक खाते धारक व्यक्तींना आपले पॅन कार्ड,फॉर्म 16 तसेच बँकेला आवश्यक इतर कोणतेही कागदपत्र बँकेत जमा न केल्यास अशा व्यक्तींची खाती बंद करण्यात येतील.तत्पूर्वी ग्राहकांना तशी पूर्व सूचना बँकेमार्फत देण्यात येईल.

बँक खाते बंद झाल्यास चालू कसे करावे?

आपण आपली KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण न केल्यास आपले बँक खाते बंद करण्यात येते.परंतु जरी आपले बँक खाते बंद करण्यात आले तरी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही.आपण आपले बँक खाते पुन्हा चालू करू शकणार आहेत.

त्यासाठी सर्व बँकांचे नियम सारखेच आहेत.आपल्याला बँक खाते पुन्हा चालू करण्यासाठी आपल्या संबंधित बँकेत आवश्यक कागदपत्रांसह जाऊन आपण आपले खाते चालू करू शकणार आहेत.संबंधित बँक आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून आपले खाते चालू करते.

तसेच देशातील काही बँकांनी आपली KYC करण्याची प्रक्रिया मोबाईलवर सुद्धा व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.आपण देखील त्या सेवेचा लाभ घेऊ शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment