Bank Cash Deposite Rules 2023 |बँकेमध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी सरकारचा नवीन नियम लागू, हे दोन कागदपत्रे सोबत असणे बंधनकारक !

Spread the love

Bank Cash Deposite Rules 2023

Bank Cash Deposite Rules 2023-
दिवसेंदिवस बँक आपले नियम बदलत चालली आहे.सरकारने देखील बँक व्यवहार संदर्भात नवीन नियम आणि अटी लागू केल्या आहेत.आत्ता आपल्याला बँकेत जाताना सोबत ही दोन कागदपत्रे अनिवार्य केली आहेत.

जर ही दोन कागदपत्रे आपल्या कडे नसतील तर आपण आपले रोख पैसे बँकेत जमा करू शकणार नाहीत.या बाबत नवीन नियम कोणते आहेत याची सविस्तर माहिती आपण या लेखा मधून घेणार आहोत. बेकायदा आणि अवैध मार्गाने येणाऱ्या रोख रकमेस आळा घालण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते.

हे पण वाचा :राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा,अखेर पीक विमा मंजूर!

यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. तो नियम नेमका कोणाला लागू होतो? या सबंधित माहिती आज आपण घेणार आहोत.

सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेमध्ये काही बदल केले आहेत.ते बदल नेमके काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत.

बँकेत रोख पैसे जमा करण्यासाठी चे नियम

(Bank Cash Deposite Rules)

मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी सरकारने काही बंधने घातली आहेत आणि त्याचे पालन आपल्याला करावे लागणार आहे.तसेच रोख रक्कम भरण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे.आता आपल्याला विविध बँकामधून पैसे काढणे किंवा टाकण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन कागदपत्रे अनिवार्य केली आहेत.

Bank Cash Deposite Limit

आता मोठ्या प्रमाणात बँकेत रक्कम जमा करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड दाखवावे लागणार आहे.इतकेच नव्हे तर मर्यादे पेक्षा जास्त रक्कम भरणा केल्यास किंवा काढल्यास दंडाची तरतूद देखील केली आहे.
ज्या व्यक्तीकडे पॅन कार्डच नसेल अशा व्यक्तीला दिवसाला फक्त ५० हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहेत किंवा त्यांना ७ दिवस अगोदरच तसे लेखी बँकेला कळवावे लागणार आहे.

त्याच प्रमाणे एखाद्या व्यक्तीने विविध बँका,फायनान्स,पोस्ट ऑफिस,सहकारी बँका यांमधून मिळून वर्षाला २० लाखापेक्षा अधिक व्यवहार केल्यास त्यांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे अनिवार्य असेल.

तर मित्रांनो आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन खूप महत्त्वाची अशी कागदपत्रे आहेत या संबंधी माहिती आपण पाहिली.अशीच नवनवीन माहिती आम्ही आपल्या पर्यंत पोहोचवत राहू .आपणही ही माहिती गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवत रहा.

अशाच माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment