Beer Bar Licence
आजकालच्या युगात सर्वसामान्य लोकांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.अनेक लोकं छोटे मोठे व्यवसाय करून उपजीविका करत आहेत.व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल आणि गुंतवणूक ही प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळी लागत आहे.व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते.
एखाद्या व्यवसायासाठी जेवढी जास्त गुंतवणूक लागते त्याच पटीत व्यवसाय धारक व्यक्तिला नफा मिळत असतो. देशातील सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अनेक तरुण व्यवसाय क्षेत्राकडे वळाले आहेत.व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर विचार येतो तो व्यवसाय कोणता करावा? कुठे करावा?त्यासाठी आवश्यक असणारे भांडवल.इत्यादी बाबींचा विचार करूनच एखादा व्यवसाय सुरू केला जातो.
अनेक तरुण वर्गाला बियर बार व्यवसायाबद्दल प्रचंड आकर्षण आहे.परंतु त्यांना बियर बार व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले लायसन्स (Beer Bar Licence)कसे काढावे? त्यासाठी कुठे अर्ज करायचा? या बद्दलची माहिती नसते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून बियर बार परवाना कसा काढतात? तसेच यासाठी किती खर्च अपेक्षित आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
बियर बार व्यवसायातील संधी
बियर बार व्यवसाय हा ५० टक्के नफा देणारा निश्चित व्यवसाय मानला जातो.आजकाल नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, वाढदिवस पार्टी,लग्नाची पार्टी असा समारंभासाठी लोकांना बियर पिणे खूप आवडते.त्यामुळे बियर बारचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.तसेच या व्यवसायाची जाहिरात करावी लागत नाही.परंतु काही राज्यांमध्ये दारू विक्री आणि खरेदीसाठी बंदी आहे.त्यामुळे बिअर बार साठी परवानगी दिली जात नाही.
हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला रीतसर परवान्याची गरज लागते.वैध परवाना नसताना कोणतेही अल्कोहोलयुक्त पेय विक्री केल्यास तो कायद्याने दंडनीय अपराध आहे.त्यासाठी शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे बिअर बार व्यवसाय सुरू करण्यासाठी वैध परवान्याची गरज असते.हा परवाना मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या एक्साईज डिपार्टमेंट कडे रीतसर अर्ज करावा लागतो. कागदपत्रांची पडताळणी करून अर्जदार व्यक्तीला एक्साईज डिपार्टमेंट कडून परवाना दिला जातो.
परवाना काढण्यासाठी काय करावे?
मद्य विक्री किंवा बिअर बार सुरू करण्यासाठी परवान्याची गरज असते.त्यासाठी राज्य सरकारच्या एक्साईज डिपार्टमेंट कडे अर्ज करावा लागतो.संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी एक्साईज डिपार्टमेंटचे ऑफिस असते तिथे तुम्हाला अर्ज करावा लागतो.तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालय कडे चौकशी करून पर्यायी ऑफिसची माहिती मिळवू शकता.
एक्साईज डिपार्टमेंट कडून बिअर बार शॉप साठी लागणारा अर्ज तुम्हाला घ्यावा लागेल.सदरच्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.अर्जावरील आवश्यक ती सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल.तसेच या अर्जावर १० रुपयांचे स्टॅम्प तिकीट चीटकवावे लागेल.तसेच आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडून सदरचा अर्ज एक्साईज डिपार्टमेंटच्या कार्यालयात जमा करावा लागेल.
बियर बार व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधित एक्साईज डिपार्टमेंट कार्यालाकडून अर्जाची पडताळणी केली जाईल. तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासून संबंधित व्यक्तीला बिअर बार सुरू करण्यासाठी परवाना दिला जाईल.
बियर बार साठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी
बियर बार व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा,कामगार, विविध मशिनरी यांची आवश्यकता असणार आहे.तसेच व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला जीएसटी नंबर देखील काढावा लागणार आहे.या व्यवसायासाठी साधारण ८०० ते १००० स्क्वेअर फूट जागेची गरज असते.तुम्हाला हा व्यवसाय सुरू केल्यानंतर २४ तास लाईट ची गरज भासते. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे १५ ते २० लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.