BMC Stenographer Recruitment 2023 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत 226 रिक्त पदांची भरती !

Spread the love

BMC Stenographer Recruitment 2023

BMC Stenographer Recruitment 2023
बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत कनिष्ठ लघुलेखक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. सदर भरती प्रक्रियेद्वारे 226 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.पद भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यक अर्हता पुढील प्रमाणे असणार आहे.अधिक आणि अचूक माहितीसाठी उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.

BMC Stenographer Recruitment 2023

संस्थेचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण रिक्त पदे- 226 पदे

रिक्त पदांचा तपशील –

पदाचे नावकनिष्ठ लघुलेखक

नियुक्तीचे ठिकाण – बृहन्मुंबई महानगरपालिका

आवश्यक शैक्षणिक पात्रता
1) मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून 10वी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2)मान्यता प्राप्त विद्यापीठातून कला/वाणिज्य/विज्ञान/विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3)उमेदवाराने इयत्ता 10वी मध्ये असताना 100 गुणांची मराठी भाषा विषयाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच इयत्ता 10वी मध्ये असताना 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4)उमेदवाराने पुढीलप्रमाणे टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक असावे.
i) मराठी टंकलेखन – 30 शब्द प्रती मिनिट
ii) मराठी लघुलेखन – 80 शब्द प्रती मिनिट
iii)इंग्रजी टंकलेखन – 40 शब्द प्रती मिनिट
iv)इंग्रजी लघुलेखन – 80 शब्द प्रती मिनिट
5)उमेदवाराकडे MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.किंवा उमेदवाराकडे MS-CIT प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून 02 वर्षाच्या आत उत्तीर्ण होऊन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येईल.
6)उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम,वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट,प्रेझेंटेशन, डेटाबेेस सॉफ्टवेअर,ई -मेल आणि इंटरनेट विषयी उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

18 ते 45 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)
1)इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून तसेच मराठी भाषा व व्याकरण,सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल.
2)सामान्य ज्ञान या विषयामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातील प्रश्न व इतर विषयांशी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील.
3)बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल.
4)कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही.
i)बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांचे परिगमन केल्यानंतर दोन किंवा दोन पेक्षा अधिक उमेदवारांचे गुण समान झाल्यास,अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास धारण केलेल्या उच्च शैक्षणिक अर्हता नुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल.
ii)क्रमवारी समान असल्यास उमेदवाराने उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेल्या दिनांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल.
iii)क्रमवारी समान असल्यास उमेदवारांच्या जन्म दिनांक नुसार पर्धण्याक्रम देण्यात येईल.(वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराचा क्रम वरती लागेल.)
iv)वरील निकष लागूनही उमेदवारांचा गुणवत्ताक्रम समान येत असल्यास अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम त्यांच्या आडनावाच्या आद्यक्षरानुसार निश्चित करण्यात येईल.

अर्ज शुल्क –
मागासवर्गीय प्रवर्ग – ₹900/-
खुला प्रवर्ग – ₹1000/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
15 ऑगस्ट 2023

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
04 सप्टेंबर 2023

मुळ जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी विशेष सूचना
1)यापूर्वी संबंधित कार्यालयामध्ये व अन्य ठिकाणी सादर केलेले/प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला किंवा इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे,स्वीकारणे इत्यादीचा अधिकार दिलेला नाही,याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
2)एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
3) मध्यस्त/ठक/मुंबई महानगरपालिकेत संबंध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनानुसार सावध राहण्याची उमेदवारांना सूचना देण्यात येत आहे.
4)सेवायोजन कार्यालय/प्रकल्प शिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी देखील या जाहिरातीनुसार online पद्धतीने अर्ज सादर करावा.
5)कनिष्ठ लघुलेखक या संवर्गातील रिक्त पदांची घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घेण्यात येईल.
6)परीक्षेच्या व्यवस्थापनामध्ये काही समस्या उद्भवल्यास
त्याचा परिणाम ऑनलाईन परीक्षा किंवा निकालावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशा परिस्थितीमध्ये परीक्षेस होणार विलंब,उमेदवारांवर होणारे परिणाम,तसेच उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्यास लागू नये यासह सर्व बाबींचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेद्वारे करण्यात येईल.
7)भरती प्रक्रियेची संबंधित सर्व बाबीबाबत महानगर पालिकेचा निर्णय अंतिम राहील.तसेच तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील.याबाबत केल्या जाणाऱ्या विचारणा व पत्रव्यवहार विचारात घेतले जाणार नाही.

🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment