Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 24 हजार रुपयांनी स्वस्त,ऑफर ‘याच’ तारखेपर्यंत,फक्त 499 रुपयांमध्ये प्रीबुकिंग करता येणार!Book Now

Spread the love

Bounce Infinity E1+ :- मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहने बनविणाऱ्या कंपन्या आहेत.जसे की Ola Electric,Ather Energy,Okaya EV आणि Bounce Infinity अशा अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर निर्मिती करत आहेत. बाऊन्स इन्फिनिटी या कंपनीने E1+ हे मॉडेल स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.बाऊन्स इन्फिनिटी कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती 21 टक्क्यांनी कमी करण्यात आलेल्या आहेत.परंतु ही ऑफर काही मर्यादित काळासाठीच उपलब्ध असणार आहे.

Bounce Infinity E1+ Price

Bounce Infinity E1+ ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने 24 हजार रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.किंमत कपातीचा निर्णय हा फक्त E1+ या व्हेरियंट साठीच लागू असणार आहे.यामुळे ही स्कूटर आता 89,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.ही ऑफर फक्त 31 मार्चपर्यंतच उपलब्ध असणार आहे.Bounce Infinity या कंपनीचे अजून दोन व्हेरियंट आहेत परंतु त्यांच्या किंमती कमी करण्याचा कोणताही निर्णय कंपनीने घेतलेला नाही.E.1 LE या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 1,08,064 रुपये आणि E.1 या व्हेरियंटची एक्स शो रूम किंमत 1,04,999 रुपये असणार आहे.

Bounce Infinity E1+ Features

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फिचर्स बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 1.9kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.ही बॅटरी चार तासांमध्ये पूर्ण चार्ज केली जाऊ शकते.तसेच यामध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी देखील सुविधा देण्यात आलेली आहे.E1+ स्कूटर साठी कंपनीने 65kmph चे टॉप स्पीड देण्यात आलेले आहे.तसेच एका चार्जमध्ये 70 किलोमीटर ची जबरदस्त रेंज देण्यात आलेली आहे.समोर आणि मागील चाकांसाठी डिस्क ब्रेक सिस्टम देण्यात आलेली आहे.तसेच चमकदार एलईडी प्रोजेक्ट हेडलाईट्स दिलेली आहे.

फक्त 499 रुपयांत करा प्रीबुकिंग Bounce Infinity E1+ Pre Booking

बाऊन्स इन्फिनिटी या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केलेल्या आहेत.कंपनीने सध्या मार्केटमध्ये तीन वेगवेगळे व्हेरियंट लाँच केलेले आहेत.ज्यामध्ये E.1,E.1+ आणि E.1 LE यांचा समावेश करण्यात आलेला आहे.कंपनीच्या माध्यमातून या इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाईन पद्धतीने प्री-बुक करता येणार आहेत.ज्यासाठी फक्त 499 रुपये आकारले जाणार आहेत.त्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन प्री बुकिंग करावी लागणार आहे.

Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 499 रुपयांत बुक करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment