महिन्याला फक्त 7 हजार रुपये EMI भरून,ह्युंदाई कंपनीची ही लोकप्रिय कार खरेदी करा,पहा संपूर्ण फायनान्सची माहिती!

Spread the love

Hyundai Car Finance Details
स्वतःकडे घर,सोने,नवीन गाडी असावी ही सर्वांची स्वप्ने असतात.जर तुम्हालाही नवीन वर्षामध्ये कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे.

भारतामध्ये विविध कंपन्या कार उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत.त्यामध्येच ह्युंदाई ही कंपनी देखील लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे.Creta,i 20,i 10,Venue अशा लोकप्रिय कार ह्युंदाई कंपनीने बनविल्या आहेत.

मागील वर्षीच ह्युंदाई कंपनीने Exter ही SUV कार लाँच केली होती.अल्पावधीतच ही कार ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे.लाखो ग्राहकांनी आतापर्यंत या गाडीसाठी बुकिंग केली आहे.ह्युंदाई कंपनीच्या सर्वाधिक विक्री केल्या जाणाऱ्या कार पैकी Exter ही SUV कार तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हे पण वाचा:- आता देशात नवीन १०,००० इलेक्ट्रिक बसेस धावणार,केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

ह्युंदाई Exter या कारचे 7,516 युनिट्स मागील महिन्यात विक्री करण्यात आले आहेत.ग्राहकांनी या कारला चांगली पसंती दिली आहे.त्यात या SUV कारची एक्स शो रूम किंमत ही 6 लाख रुपयांपासून सुरू होते.त्यामुळे लोकांमध्ये लोकप्रिय होण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या कारची संपूर्ण फायनान्स डिटेल्स आम्ही देत आहोत.कमी हप्ता आणि सुलभ परतफेड याचे गणित आज आपण समजून घेऊया.

भारतातील अनेक बँका आणि फायनान्स कंपन्या वाहन खरेदी करण्यासाठी कर्जाचा पुरवठा करत असतात. बँकांच्या किंवा फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून वार्षिक ८ टक्के ते १२ टक्के दराने कर्जाचा पुरवठा केला जातो.तुम्ही जर एखाद्या बँकेकडून वार्षिक ८ टक्के दराने वाहन कर्ज घेतले तर तुम्हाला किती डाऊन पेमेंट भरावे लागेल आणि किती हप्ता भरावा लागेल याची माहिती आपण जाणून घेऊया.

किती डाऊन पेमेंट भरावे लागेल?

तुम्हाला जर ह्युंदाई कंपनीची Exter या गाडीचे बेस व्हेरीएंट खरेदी करायचे असेल तर त्याची एक्स शो रूम किंमत ६ लाख असणार आहे.तुम्हाला बँक द्वारे किंवा फायनान्स कंपनीने ८० टक्के वाहन कर्ज दिल्यास तुम्हाला उर्वरित २० टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागेल.

त्यामुळे तुम्हाला १ लाख २० हजार रुपये डाऊन पेमेंट आणि आरटीओ तसेच इन्शुरन्सचा खर्च स्वतः भरावा लागणार आहे.यामुळे तुम्हाला बँकेकडून आरटीओ आणि इन्शुरन्स खर्च वगळता ७ वर्षांच्या म्हणजेच ८४ महिन्यांच्या परतफेडीसाठी वार्षिक ८ टक्के व्याजदराने ४ लाख ८० हजार रुपये वाहन कर्ज मंजूर केले जाणार आहे.

तुम्हाला कर्जाची रक्कम ८४ महिन्यांमध्ये परतफेड करायची आहे.यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला हप्ता म्हणजेच EMI साठी ७,४८१ रुपये भरावे लागणार आहेत.त्यामुळे तुम्हाला ७ वर्षांमध्ये ४ लाख ८० हजार रुपयांच्या वाहन कर्जासाठी एकूण १,४८,४३६ रुपये व्याज भरावे लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment