Cabinet Decision:- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय, पाहा सविस्तर!

Spread the love

Cabinet Decision

Cabinet Decision
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय (Cabinet Decision)खालील प्रमाणे

Table of Contents

काय घेतले निर्णय?

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

मार्फत सन 2023-24 या वर्षाकरिता कोविड -१९ संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे बाबत योजनेकरीता निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सन 2023-24 या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डास निधी वितरित करणेबाबत मंजुरी देण्यात आली.Cabinet Decision

गृह विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यास मंजुरी

पोलिस उप अधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त या संवर्गातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली/पदस्थापनेबाबत निर्णय घेण्यात आला.

जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पद स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य चर योजना मापदंड व कार्यपद्धती धोरण ठरविण्याकरिता आंतर विभागीय अभ्यास गटाच्या स्थापनेस मुदतवाढ देणेबाबत.Cabinet Decision

कार्यकारी अभियंता,उपसा सिंचन विभाग,उस्मानाबाद कार्यालय व अंतर्गत 5 उप विभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रूपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01/09/2023 ते दि.29/02/2024 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणु नदीला या अभियानासाठी गठित समिती व उपक्रमास मुदतवाढ देणेबाबत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

शालार्थ प्रणालीतील NPS करिता आवश्यक PFX Document Signer Certificate ईमुद्रा कंपनीकडून खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत Ernst Young कंपनीच्या सल्लागारांचे सेवा शुल्क अदा करण्याबाबत.

समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जमाती उपाययोजना (TSP) लेखा शिर्षांतर्गत राज्य शासनाचा हिस्सा वितरित करण्याबाबत.

हे पण नक्की वाचा:- राज्यातील 43 तालुक्यामध्ये दुष्काळ, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 17 हजार रुपये

ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

सन 2023-24 या वर्षामधील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत National Rural Economic Transformation Project (NRETP) योजनेकरीता अर्थसहाय्य.

महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नाशिक,औरंगाबाद,पुणे विभाग)

अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यातील स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत.

श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२),हवेली क्र.23 यांचे निलंबनाबाबत.

उजनी प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे चांदज व शेवरे या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

मा. मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग,मंत्रालय,मुंबई यांच्या कार्यालयीन वाहनांच्या दुरुस्तीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.Cabinet Decision

नियोजन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील सहसंचालक गट-अ संवर्गाची दिनांक 01/01/2023 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.

नियोजन विभाग च्या आस्थापनेवरील वाहनचालक गट-क व गट-ड ची पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास सेवा पुरवठादार संस्थेला/एजन्सीला मान्यता देण्याबाबत

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क,कोल्हापूर येथे श्रोतगृह इमारतीकरिता फर्निचर, कोस्टिक,विद्युतीकरण व इतर अनुषंगिक बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल इमारत बांधकामास निधी वितरित करण्याबाबत.

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्याकरिता भुयारी मार्ग व सर्व्हिस रस्ता बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत

सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्य सेवा हक्क आयोग,नागपूर या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

राज्यातील विमानतळ/धावपट्ट्यांच्या विकासासाठी लेखाशिर्ष(३०५३०१४६) खाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस निधी वितरित करणेबाबत.

अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करणेबाबत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment