Crop Insurance 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विविध पिकांचा पीक विमा उतरविला होता. आता त्याच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण ५७ महसुली मंडळे आहेत.त्यापैकी 40 महसुली मंडळांना सुरुवातीला अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता.उर्वरित १७ महसुली मंडळांचा तिढा तसाच होता.परंतु आता सर्वच ५७ महसुली मंडळांना अग्रिम पीक विमा जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली आहे.
अग्रिम पीक विमा मंजूर झाल्याचे पत्र धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना दिले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या १७ मंडळातील शेतकऱ्यांना देखील मिळणार अग्रिम पीक विमा
धाराशिव जिल्ह्यात एकूण ५७ महसुली मंडळे आहेत. सुरुवातीला त्यापैकी १७ महसुली मंडळांना अग्रिम पीक विमा(Crop Insurance 2023) देण्यास विमा कंपनीने नकार दिला होता.परंतु आता या १७ महसुली मंडळांना देखील अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे.या मध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग,भूम तालुक्यातील भुम,वालवड, अंभी,पाथरुड, माणकेश्वर,आष्टा,कळंब तालुक्यातील कळंब,ईटपुर,मोहा आणि गोविंदपूर, परांडा तालुक्यातील आसू,जवळा, पाचपिंपळा उमरगा तालुक्यातील नारंगवाडी तसेच वाशी तालुक्यातील वाशी आणि तेरखेडा मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
हे पण वाचा:- तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला का नाही ते असे चेक करा!
किती शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता?
धाराशिव जिल्ह्यातील 7 लाख 57 हजार 853 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या(Crop Insurance 2023) अंतर्गत खरीप पिकांचा पीक विमा संरक्षित करण्यासाठी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 5 लाख 60 हजार 468 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 406 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक संरक्षित केले होते.
किती मिळणार अग्रिम पीक विमा? Crop Insurance 2023
पावसामध्ये पडलेला खंड,रोगराई,कीड आणि दुष्काळ यांमुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईच्या 25 टक्के पीक विमा मिळण्याची तरतूद आहे.त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी अधिसूचना काढून पीक विमा कंपनीला आदेश दिले होते. धाराशिव जिल्ह्यातील ५७ महसुली मंडळातील ४ लाख ९८ हजार ६२० शेतकऱ्यांना मिळून एकुण 218 कोटी 86 लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.