Check Namo Shetkari Yojana Status Free:- तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आला का नाही?ते असे चेक करा!

Spread the love

Namo Shetkari Yojana Status


नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असताना शिर्डी येथून त्यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता दोन हजार रुपये जमा करण्यात आला आहे.मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Yojana) शुभारंभ करण्यात आला.

हे पण वाचा:- आता गंभीर आजारावर होणार मोफत उपचार, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

परंतु राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही.पीएम किसान योजनेच्या करिता केंद्र सरकारने वेबसाईट पोर्टल चालू केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेच्या संबंधित माहिती ही ऑनलाईन पद्धतीने घेता येत आहे.

राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी आता नवीन वेबसाईट पोर्टल सुरू करण्यात आले आहे.त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला की नाही याची माहिती घेता येणार आहे.(Namo Shetkari Yojana Status) यादीत आपले नाव कसे चेक करायचे याबद्दलची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत.

कसे चेक करायचे?Namo Shetkari Yojana Status

•नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
•तुमच्या मोबाईल मधील Google Chrome ब्राऊझर मध्ये जाऊन https://nsmny.mahait.org या वेबसाईटला ओपन करावे.
•तुमच्यासमोर वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला Login आणि Beneficiary Status असे दोन पर्याय दिसतील.
•तुम्हाला Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•आता तुम्हाला Beneficiary Status चेक करण्यासाठी तुमचा पीएम किसानचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहित असणे आवश्यक आहे.
•आता तुम्हाला तुमचा PM Kisan Registration Number टाकून Get Data या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•तुम्ही Get Data या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नमो शेतकरी योजनेचे स्टेटस् (Namo Shetkari Yojana Status) पाहता येणार आहे.

नमो शेतकरी योजनेचे स्टेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment