CM Medical Assistance Fund:- आता या 20 प्रकारच्या गंभीर आजारांवर होणार मोफत उपचार,जाणून घ्या कसा करायचा अर्ज? Free Treatment

Spread the love

CM Medical Assistance Fund

CM Medical Assistance Fund
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.प्रत्येक कुटुंबाची उपचारासाठी खर्च करण्याची ऐपत नाही.त्यामुळे राज्यातील अनेक व्यक्ती उपचाराअभावी दुर्धर आजाराने ग्रासले आहेत.परंतु अशा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारने उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी (CM Medical Assistance Fund) ची स्थापना केली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून अनेक दुर्धर तसेच विविध आजारांच्या उपचारांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जाते आहे.आज आपण या लेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मोफत उपचारासाठी कसा अर्ज करायचा? तसेच कोणत्या उपचारांसाठी मोफत उपचार केला जातो याची माहिती जाणून घेणार आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जातो.त्यासाठी ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागतो.त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देत आहोत.तसेच आता तुमच्या मोबाईलवरून देखील टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देखील अर्ज करता येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून ८६५०५६७५६७ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.

कोणत्या आजारांच्या उपचारांसाठी मदत मिळते?
CM Medical Assistance Fund

मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एकूण वीस प्रकारच्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मदत केली जाते.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार २५ हजार ते दोन लाखांपर्यंत रुग्णांना उपचारासाठी मदत केली जाते.

१.कॉकलियर इम्प्लांट (वय २ ते ६ वर्षे)
२.हृदय प्रत्यारोपण
३.यकृत प्रत्यारोपण
४.किडणी प्रत्यारोपण
५.फुफ्फुस प्रत्यारोपण
६.बोन मॅरो प्रत्यारोपण
७.हाताचे प्रत्यारोपण
८.हिप रेप्लेसमेंट
९.कर्करोग शस्त्रक्रिया
१०.अपघात शस्त्रक्रिया
११.लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२.मेंदूचे आजार
१३.हृदयरोग
१४.डायलिसिस
१५.कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन)
१६.अपघात
१७.नवजात शिशुंचे आजार
१८.गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९.बर्न रुग्ण
२०.विद्युत अपघात

हे पण वाचा:- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा आदेश,या जिल्ह्याचा अग्रिम पीक विमा मंजूर!

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१.विहित नमुन्यातील अर्ज
२.निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र(खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांचेकडील प्रमाणपत्र आवश्यक)
३.तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा १.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४.रुग्णाचे आधारकार्ड
५.लहान बाळांसाठी आईचे आधारकार्ड
६.रुग्णाचे रेशनकार्ड
७.संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे
८.अपघातग्रस्त रुग्णांसाठी MLC रिपोर्ट
९.प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC/शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
१०.रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

मुख्यमंत्री सहायता निधी साठी आवश्यक असलेला फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment