Crop Insurance News
Crop Insurance news
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत आनंदाची बातमी असणार आहे. शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी २५% अग्रिम पीक विमा जमा करणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
२३ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीची पाहणी करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली.त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पीक विम्याबाबत भाष्य केले.नागपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा आणि रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
हे पण नक्की वाचा :- या यादीमध्ये नाव असेल तर मिळणार १२०००/- रुपये
कृषीमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.या वेळी त्यांनी जिल्ह्यातील उमरगाव, पाचगाव, विरखंडी या प्रमुख गावांना भेट दिली.आणि तिथे उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.शेतकऱ्यांची विविध मागण्यांची निवेदने देखील स्वीकारली.
महाराष्ट्र राज्य 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविणारे देशातील पहिले राज्य असल्याचे कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितले.उर्वरित प्रीमियम रक्कम शासनाने भरली आहे.
या वर्षी राज्यातील 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.त्याचबरोबर अंतरपिकाचा देखील विमा काढण्यात आला आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना २५% अग्रिम पीक विमा दिवाळीपूर्वी देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.तसेच ज्या भागांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा अधिक सलग 4 तास पाऊस झाला असेल अशा ठिकाणी देखील आपदा मदत निधी (एसडीआरएफ) आणि केंद्रीय आपदा मदत निधी (एनडीआरएड) नियमानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.