Swachh Bharat Mission :- या यादीमध्ये नाव असेल तर मिळणार 12000/- रुपये,तत्काळ हे काम करा!

Spread the love

Swachh Bharat Mission

Swachh Bharat Mission
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखामधून केंद्र सरकारच्या एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार हे नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते.

नागरिकांचे राहणीमान उंचावे त्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे हाच कोणत्याही योजनेचा मुख्य हेतू असतो.
मागील काही काळापासून सबंध देशभर केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियान मिशन राबविले जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून शहरी त्याचबरोबर ग्रामीण भागात स्वच्छता गृहे उभारण्याचे काम केले जात आहे.
देशात अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई दूर करण्यासाठी त्याचबरोबर देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे या हेतूने स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे.

केंद्र सरकारने 2014 साली स्वच्छ भारत अभियान उघड्यावरील शौच दूर करण्यासाठी आणि घन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ही देशव्यापी योजना सुरू करण्यात आली आहे.Swachh Bharat Mission

ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील शौचास बाहेर जाणाऱ्या तसेच शौचालय बांधण्यासाठी असमर्थ असणाऱ्या नागरीकांसाठी ही योजना राबविली जात आहे.

हे पण वाचा:- महाडीबीटी पोर्टल वर एक अर्ज करा अनेक योजनांचा लाभ मिळवा

उघड्यावर शौचाला बसल्यास अनेक आजार उद्भवतात त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.हे लक्षात घेऊन सरकार शौचालय बांधण्यासाठी अनुदान देत आहे.

सुरुवातीला महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी दिले जाणारे अनुदान बंद करून तोच निधी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालये बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून 12000/- रुपये अनुदान दिले जात आहे.केंद्र सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.Swachh Bharat Mission

सदर यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला 12000/- रुपये अनुदान दिले जाणार आहे.हे अनुदान डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment