Mahadbt Farmer Scheme:- महाडीबीटी पोर्टल वर, एक अर्ज करा अनेक योजनांचा लाभ मिळवा!

Spread the love

Mahadbt Farmer Scheme

Mahadbt Farmer Scheme
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टल वर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे.कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर कृषी यंत्रांची वाटप करण्यात येते.

कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटप करताना पारदर्शकता यावी म्हणून राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल वरून अनेक योजनांसाठी एकच अर्ज करावयाचा आहे.सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के ते 80 टक्के अनुदान वाटप करण्यात येते.

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे खरेदीसाठी 50% अनुदान वितरित केले जाते.चालू वर्षासाठी राज्य शासनाकडून या करीता 56 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

शेतकरी कशासाठी अर्ज करू शकतो?

या योजनेच्या अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर,ट्रॅक्टर चलित अवजारे ,नांगर, रोटावेटर, शेततळे, शेततळे कागद,तुषार सिंचन,ठिबक सिंचन,प्लास्टिक मल्चिंग,कांदा चाळ, पीव्हिसी पाइप, कडबाकुट्टी, इलेक्ट्रिक मोटर,शेडनेट, हरितगृह,फळबाग इत्यादी योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकरी शेतीच्या संबंधित औजारे जसे की ट्रॅक्टर, पॉवर टिलर, बैल चलित औजारे पेरणी यंत्र, फवारणी पंप,नांगर यांसारख्या औजारे खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1.आधार कार्ड
2.बँक पासबुक
3.७/१२ व ८अ उतारा
4.जातीचा दाखला (अनु.जाती/जमाती प्रवर्गासाठी)
5.महिला शेतकऱ्यांना प्राधान्य राहील
6.माजी सैनिक असल्यास प्राधान्य देण्यात येईल

अर्ज कुठे करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वरून देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.त्यासाठी येथे क्लिक करा

जर तुम्हाला मोबाईल वरून अर्ज करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील आपला अर्ज करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment