Crop Insurance
महाराष्ट्र राज्यातील ४९ लाख ५ हजार ३२ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विम्याच्या(Crop Insurance) नुकसान भरपाईपोटी २०८६ कोटी ५४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांना बँकेचे मेसेज देखील आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील ३६,३५८ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विम्याच्या नुकसान भरपाई साठी १८ कोटी ३९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.मंजूर रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून अतिवृष्टी,पुर,दुष्काळ,कीड आणि रोग यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होते त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पिकांना विमा संरक्षण दिले जाते.महाराष्ट्र राज्य सरकारने यंदा एक रुपयात पीकविमा ही योजना राबविली होती.या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांकडून नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी लावून धरली होती.त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.
परंतु ही अग्रिम पीक विम्याची(Crop Insurance) रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास दिरंगाई केली जात होती.यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारले होते.या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या.यामध्ये मंजूर झालेला अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा ही प्रमुख मागणी होती.सरकारने या मागणीला हिरवा कंदील दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.