तुम्हाला शेतजमीन पाहिजे?इथे अर्ज करा,राज्य सरकारचे शेती महामंडळ देणार तुम्हाला शेतजमीन,विश्वास नाही ना बसत?मग नक्की जाणून घ्या!

Spread the love

Farm Land On Lease
भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.परंतु संपूर्ण देशात किंवा महाराष्ट्रात अशी अनेक लोकं आहेत ज्यांच्याकडे शेती नाहीये.पण त्यांना शेती करायची आवड आहे.महाराष्ट्रात सीलिंग कायदा अस्तित्वात आला आणि मोठ्या शेतजमीनदारांच्या जमिनी सरकारने जमा केल्या.या जमा केलेल्या शेतजमिनी सांभाळण्यासाठी सरकारने स्वायत्त शेती महामंडळाची स्थापना केली.

हे स्वायत्त शेती महामंडळ एक प्रकारे राज्य शासनाच्याच अंगीकृत आहे.जमा करण्यात आलेल्या शेतजमिनीवर महामंडळाकडून शेती केली जाऊ लागली.परंतु महामंडळाला यातून पुरेसे उत्पन्न मिळू शकले नाही त्यामुळे शेती तोट्यात येऊ लागली.यामुळे महामंडळाने शेतकऱ्यांसोबत संयुक्त शेती करण्याचा निर्णय घेतला. आजतागायत देखील शेतकऱ्यांसोबत संयुक्त शेती केली जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या शेतजमिनी भाड्याने उपलब्ध होऊ लागल्या आहेत.राज्याच्या शेती महामंडळाकडे आजतागायत सुमारे ४१ हजार एकर शेतजमीन शिल्लक आहे.

जमीन भाड्याने घेण्यासाठी काय करावे?
Farm Land On Lease

महाराष्ट्र राज्याच्या शेती महामंडळाकडे सध्या ४१ हजार एकर शेतजमीन शेतकऱ्यांना भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे.त्यापैकी जवळपास २३ हजार एकर शेतजमीन भाड्याने दिलेली आहे.या जमिनी १० वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आल्या आहेत.संबंधित शेतजमिनीचा भाडे करार संपल्यानंतर शेती महामंडळाकडून पुन्हा या जमिनी जो व्यक्ती जास्त भाडे देईल त्यांना दिल्या जातात.

हे पण वाचा:- बियर बार सुरू करण्यासाठी लायसन्स कसे काढावे?त्यासाठी अर्ज कुठे करायचा?किती खर्च येतो?जाणून घ्या संपूर्ण माहिती!

शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी mahatenders.gov.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागाच्या अंतर्गत शेतजमीन भाड्याने देण्याच्या निविदा निघतात.या निविदा पाहण्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच वरील संकेतस्थळावरच्या निविदा प्रक्रियेकडे लक्ष ठेवावे लागेल.शेतकऱ्याने निविदा काढण्यात आलेल्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी,रस्ता,वीज इत्यादी सोयींची तपासणी करूनच निविदा भरणे आवश्यक आहे.तसेच निविदा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेती महामंडळाशी संपर्क करावा लागेल.

निविदेमध्ये शेतजमिनीची कोणती माहिती असते?

शेती महामंडळाकडून भाड्याने द्यावयाच्या शेतीचा सातबारा उतारा,शेतीचा पत्ता,गट नंबर,त्या शेतीचा नकाशा,पाण्याची सोय,विजेची सोय,आसपास कोणती पिके घेतली जातात याबाबतची माहिती निविदेमध्ये नमूद करण्यात आलेली असते.

कोण अर्ज करू शकतो?

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपन्या, खाजगी संस्था,बिगर शेतकरी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी शेती महामंडळाकडून कोणतेही नियम आणि अटी घालण्यात आलेल्या नाहीत.परंतु महामंडळाकडून ज्या अवस्थेत शेतजमीन भाड्याने घेतली होती त्याच अवस्थेत महामंडळाला परत करावी लागते.

शेतजमीन भाड्याने घेतल्यावरच्या अटी

•महामंडळाकडून भाड्याने घेतलेल्या शेतजमीनीवर घर,बंगला,शेड किंवा कायमस्वरुपी अस्तित्वात राहणारे कोणतेही बांधकाम करता येत नाही.ही जमीन फक्त पिकांची लागवड करण्यासाठीच उपलब्ध करून दिलेली असते.

•भाडेकरू शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची माहिती महामंडळाला देणे बंधनकारक आहे.तसेच ज्या पिकांचे आयुष्मान १० वर्षांपेक्षा कमी आहे अशीच पिके लागवड करता येणार आहेत.

•महामंडळाने भाडे तत्वावर दिलेल्या जमिनींवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येत नाही.त्यासाठी सरकारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांची नेमणूक केलेली असते.

•भाडे तत्वावर मिळालेल्या शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया उद्योग किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

•भाडे तत्वावर मिळालेल्या शेतजमिनींवर संबंधित शेतकरी पाणी व्यवस्थापन करण्यासाठी विहीर,बोअरवेल किंवा शेततळे खोदू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment