Crop Insurance
Crop Insurance
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात पडलेला पावसाचा मोठा खंड शेतकरी तसेच सरकार साठी मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे.शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अपुऱ्या पावसामुळे होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी या करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे.
नांदेड जिल्ह्यात 2022 साली खरीप हंगामातील पिकांचे शेती पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून विमा कंपनीकडून (Crop Insurance)पीक विमा देणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार जिल्ह्यातील 10 लाख 57 हजार 508 शेतकऱ्यांनी 51 हजार 422 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता.
हे पण नक्की वाचा:- सरकार देणार मोफत डिश टीव्ही,चॅनेल पाहता येणार फ्री
नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना एकूण 472 कोटी 51 लाख रुपये वाटप करण्यात येणार आहेत.या रकमेतील 366 कोटी 50 लाख रुपये शासनाच्या अधिसूचनेनुसार वाटप करण्यात आले.तसेच उर्वरित 106 कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत देण्यात आले आहेत.Crop Insurance
शेतकऱ्यांना 25% आगाऊ रक्कम मिळावी या करिता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मिड सीझन डायव्हर्सिटीची अधिसूचना काढली होती.यामध्ये तूर, सोयाबीन,खरीप ज्वारी आणि कापूस या पिकांचा समावेश करण्यात आला.Crop Insurance
पीक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पीकविमा ज्या महसूल विभागांना मंजूर होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदरची रक्कम जमा होईल.
तसेच वाढीव 75% नुकसान भरपाईची तरतूद पीक विमा योजनेत नसल्याने शेतकऱ्यांनी चुकीच्या संदेशाला बळी पडू नये.असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. Crop Insurance
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.