Government Free Dish TV Yojana
Government Free Dish TV Yojana
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण केंद्र सरकारच्या एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.चला तर मग जाणून घेऊया!
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. देशातील नागरिकांना रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य वाटप,राहायला पक्की घरे यांसारख्या योजना राबविल्या जातात.Government Free Dish TV Yojana
लोकांची आता सोशल मीडिया कडे जास्त ओढ लागली आहे.आणि हीच बाब लक्षात घेऊन सरकार आता देशातील नागरिकांना मोफत डिश टीव्ही देण्याचा निर्णय घेणार आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर 2540 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
हे पण नक्की वाचा:- आता तुमच्या ग्राम पंचायतच्या सर्व योजनांची माहिती मिळवा मोबाईलवर
सरकारतर्फे सध्या दूरदर्शन आणि आकाशवाणी सारखे चॅनेल मोफत दाखवले जातात. त्यावरील भार कमी करण्यासाठी सरकार मोफत 800 पेक्षा जास्त चॅनेल मोफत करणार आहे.हे ब्रॉडकास्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क डेव्हलपमेंट म्हणून ओळखले जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन यांमध्ये सुधारणा होणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षक्तेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. 2025-26 पर्यंत या योजनेची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
Government Free Dish TV Yojana
या योजनेच्या अंतर्गत उत्तम दर्जाचे चॅनेल मोफत उपलब्ध करून दिले जातील.देशातील नागरिकांना,विद्यार्थ्यांना, सीमावर्ती भागातील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे चॅनेल मोफत केले जातील.जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडावी.
त्याचबरोबर जवळपास 800 हून अधिक ऑल इंडिया रेडिओ केंद्रांचे प्रसारण मोफत केले जाईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा