Dairy Scheme
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पशू किसान क्रेडिट कार्ड (Dairy Scheme) योजना सुरू करण्यात आली आहे.पशू किसान क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाळ गाय किंवा म्हैस खरेदीसाठी १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.या कर्जावर शून्य टक्के व्याज आकारले जाणार आहे.म्हणजेच या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही.
आजच्या या लेखामधून आपण पशू किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे? आवश्यक पात्रता? अर्ज कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून २०२४ या वर्षापासून देशातील पशुपालक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशू किसान क्रेडिट कार्ड (Dairy Scheme)वाटपाची योजना सुरू केली आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, शेतकऱ्याची आर्थिक तसेच सामाजिक प्रगती व्हावी.यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही.
हे पण वाचा:- या शेतकऱ्यांना नाही मिळणार दूध अनुदान,पहा काय आहेत अनुदानाचे निकष, जाणून घ्या सविस्तर!
पशु किसान क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये
Dairy Scheme
•पशु किसान क्रेडिट कार्डची कमाल कर्ज मर्यादा ही १.६० लाख रुपयांपर्यंत आहे.
•लाभार्थी शेतकरी त्यांच्या गरजेनुसार कर्जाची मर्यादा ठरवू शकतो.
•पशू किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक दुधाळ गाय खरेदीसाठी ६० हजार ७८३ रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
•तसेच एक दुधाळ म्हैस खरेदी करण्यासाठी ७० हजार २४९ रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
बिगरब्याजी कर्ज सुविधा
पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कर्जावर बँकेकडून ७ टक्के व्याज आकारले जाते.यामध्ये प्रामुख्याने ३ टक्के व्याज केंद्र सरकार आणि ४ टक्के व्याज राज्य सरकार भरणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त मुद्दलाची रक्कम परतफेड करावी लागणार आहे.या योजनेच्या माध्यमातून कमाल व्याज मर्यादा ही १.६० लाख रुपये आहे.
अटी आणि शर्ती
•या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज शेतकऱ्यांनी ५ वर्षे मुदतीच्या आत फेडायचे आहे.
•शेतकऱ्यांनी बँकेने नमूद केलेल्या विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केली तरच व्याजामध्ये सूट मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
•आधार कार्ड
•पॅन कार्ड
•मतदार ओळखपत्र
•रहिवाशी प्रमाणपत्र
•पशू आरोग्य प्रमाणपत्र
•पशू विमा पॉलिसी प्रमाणपत्र
•सिबील स्कोर
•मोबाईल क्रमांक
अर्ज कुठे करायचा?
•पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
•अर्जावरील सर्व माहिती अचूक भरायची आहे.
•अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे.
•तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला पशू किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.