या शेतकऱ्यांना नाही मिळणार दूध अनुदान,पहा काय आहेत अनुदानाचे निकष,जाणून घ्या सविस्तर!Milk Subsidy Maharashtra

Spread the love

Milk Subsidy Maharashtra
दूधदराची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने, सहकारी दूध संघांकडे दूधसंकलन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.पण,हे पाच रुपयांचे अनुदान सरकारी निकषाच्या चौकटीतच अडकून पडण्याची भीती आहे.शिवाय खासगी दूध संघाकडे दूधसंकलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार नाही.त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांसाठी एक मृगजळ ठरणार आहे

राज्यभरातील विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान(Milk Subsidy Maharashtra) देण्याचा निर्णय घेतला.मात्र,हे अनुदान नियमांच्या चौकटीतच अडकून पडण्याची शक्यता आहे.संबंधित शेतकऱ्याने सहकारी दूध संघाला दूध घातले पाहिजे.त्या संघाने २९ रुपये प्रतिलिटर दर दिला तरच राज्य सरकारकडून पाच रुपये मिळणार आहेत.

पाच रुपये मिळण्यासाठी सहकारी दूध संघाने दूधबिल शेतकऱ्याच्या खात्यात ऑनलाइन जमा करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि गाईचे एअर टॅगिंग म्हणजे गाईचे आधारकार्ड यांची ऑनलाइन जोडणी झालेली असणे गरजेचे आहे.तरच हे पाच रुपयांचे अनुदान मिळणार आहे.सरकारने ही घोषणा करताना सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे लागू केले आहे. खासगी दूध संघाना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लागू असणार नाही.त्यामुळे खासगी संघांना दूध पुरविणारे शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,दुधाला मिळणार प्रती लिटर ५ रुपये अनुदान,ही अट बंधनकारक!

खासगी दूध संघांमार्फत मोठे संकलन

राज्यात संकलित होत असलेल्या एकूण दुधापैकी ७२ टक्के दूध खासगी दूध संघामध्ये संकलित होते.सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दुधापैकी ७२ टक्के दूधउत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांमध्ये असा अन्याय न करता राज्यातील सर्व दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे व राज्यात ३.२/८.३ गुण प्रतीच्या दुधाला किमान ३४ रुपये दर मिळेल यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत,अशी मागणी किसान सभा व दूधउत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

सहकारी दूध संघांना दूध पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देतानाही सरकारने नेहमीप्रमाणे अटीशर्तीचे अडथळे निर्माण केले आहेत. अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गाईचे पशुगणनेंतर्गत एअर टॅगिंग झालेले असले पाहिजे व ते शेतकऱ्याच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, अशी जोडणी न झालेल्या गाईच्या दुधाला अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.अशी माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी दिली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment