ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60,000 रुपये मानधन,राज्य सरकारची नवीन योजना! Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

Spread the love

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरू करण्याचा निर्णय १३ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आला आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता,निर्वाह भत्ता,निवास भत्ता यासाठी सरकारच्या माध्यमातून वार्षिक ६० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
OBC Scholarship Yojana

राज्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविली जाणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना तसेच सामाजिक विभागाच्या माध्यमातून राबविली जाणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनांच्या धर्तीवर इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

या विद्यार्थ्यांना नाही मिळणार लाभ
Gyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले किंवा घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

किती विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेच्या अंतर्गत इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती (दीनदयाळ उपाध्याय योजनेचा लाभ घेत असलेले/घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणारे प्रत्येक जिल्ह्यातील ६०० विद्यार्थी या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे पण वाचा:- १८ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना,महिन्याला मिळणार ५००० रुपये!

मिळणाऱ्या मानधनाचे तपशील
Gyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

या योजनेच्या अंतर्गत मुंबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई,ठाणे,पुणे,पिंपरी चिंचवड,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता ३२,००० रुपये,निवास भत्ता २०,००० रुपये,निर्वाह भत्ता ८,००० रुपये असे एकूण ६०,००० रुपयांचे वार्षिक मानधन दिले जाणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

इतर महसुली विभागीय व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २८,००० रुपये,निवास भत्ता १५,००० रुपये आणि निर्वाह भत्ता ८,००० रुपये असे एकूण ५१,००० रुपये वार्षिक मानधन दिले जाणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

वरील जिल्हे वगळून इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २५,००० रुपये,निवास भत्ता १२,००० रुपये आणि निर्वाह भत्ता ६,००० रुपये असे एकूण ४३,००० रुपये वार्षिक मानधन देण्यात येणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

तसेच तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २३,००० रुपये निवास भत्ता १०,००० रुपये आणि निर्वाह भत्ता ५,००० असे एकूण ३८,००० रुपये वार्षिक मानधन विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.विशेष बाब म्हणजे सदर योजनेचे मानधन विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

अर्ज कुठे करायचा?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून १३ डिसेंबर २०२३ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे.हा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतरच योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment