Drought In Maharashtra:- महाराष्ट्रात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर,पहा शासन निर्णय!

Spread the love

Drought In Maharashtra
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्या टप्यात १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

त्यानसुसार दुष्काळी तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ आदी सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत पीक-पाणी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यंदा कमी पाऊस झाला असून,त्यातही १५ ते २० जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत सलग २१ दिवस पाऊस न पडल्याने पेरण्या वाया गेल्या आहेत.

या भागांत पिण्याचे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट नोंदवण्यात आली असून, रब्बी पेरण्याही संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

नंदूरबार, चाळीसगाव, भोकरदन जालना, बदनापूर, अंबड, मंठा छत्रपती संभाजीनगर, सोयगाव मालेगाव, सिन्नर, येवला,पुरंदर सासवड,बारामती, वडवनी,धारूर, अंबेजोगाई,रेणापूर,वाशी,धाराशिव, लोहारा, बार्शी, माळशिरस, सांगोला या १६ तालुक्यांत गंभीर परिस्थिती आहे.


हे पण वाचा:- राज्यात 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर-टू लागू,शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 17 हजार रुपये

सिंदखेडा,बुलढाणा,लोणार,शिरुर घोडनदी, दौंड, इंदापुर,करमाळा,माढा,वाई,खंडाळा, हातकनंगले, गडहिंग्लज,शिराळा,कडेगांव,खानापूर विटा,मिरज अशा १६ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.

उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थती जाहीर करून योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकर निर्णय घ्यावा,असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.तसेच दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

काय सवलती भेटणार?

जमीन महसूलात सूट,पीककर्जाच्या वसुलीस स्थगिती आणि कर्जाचे पुनर्गठन,कृषी पंपाच्या विजबिलात ३३.५ टक्के सूट,विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.तसेच रोजगार हमी योजनेवरील कामांचे निकष शिथिल,आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा, कृषिपंपाची वीज जोडण्या खंडित न करण्याचे आदेश,सुट्टीतही सर्व शाळांमध्ये मध्यान्ह – भोजन योजना सुरू राहणार आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment