Dushkal Alert:- राज्यातील या तालुक्यांमध्ये देखील दुष्काळ जाहीर,शेतकऱ्यांना मिळणार मोबदला!

Spread the love

Dushkal Alert
यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून,पुढील उन्हाळा गंभीर असेल,याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.गेल्या आठवड्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता १७८ तालुक्यांमधील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसनविषयक उपसमितीने गुरुवारी घेतला.

त्यामुळे राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या महसुली मंडळांमध्ये झा दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व दुष् सवलती लागू करण्यात आल्याची अ माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. आपत्ती निवारणासाठी उपाय योजण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.Dushkal Alert

राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागांत दुष्कळाच्या झळा बसू लागल्या आहेत.या भागांत दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी जोर धरू लागली होती.त्याची दखल घेत राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात १६ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती.त्यावर सरकारने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काही ठिकाणी आंदोलन केले होते. सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमधील १२०० पेक्षा अधिक महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर(Dushkal Alert) करण्यात आला आहे.

राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाबाबत मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्येही त्वरित उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

हे पण वाचा:- या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मिळणार २०,०००/- रुपयांची मदत!

या जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश

अकोला (७ तालुक्यांतील ५० मंडळे),अमरावती (१३ तालुक्यांतील ७३ मंडळे),बुलढाणा (११ तालुक्यांतील ७० मंडळे),वाशीम (६ तालुक्यांतील ३१ मंडळे), यवतमाळ (५ तालुक्यांतील ९ मंडळे), छत्रपती संभाजीनगर (७ तालुक्यांतील ५० मंडळे).बीड ( ८ तालुक्यातील ५२ मंडळे), हिंगोली (५ तालुक्यातील १३ मंडळे), जालना (३ तालुक्यांतील १७ मंडळे),लातूर (९ तालुक्यांतील ४५ मंडळे), नांदेड (८ तालुक्यांतील २३ मंडळे), धाराशीव (५ तालुक्यांतील २८ मंडळे).Dushkal Alert

परभणी(९ तालुक्यांतील ३८ मंडळे), नागपूर (४ तालुक्यांतील ५ मंडळे),वर्धा ( ४ तालुक्यांतील सहा मंडळे), अहमदनगर (१४ तालुक्यांतील ९६ मंडळे), धुळे (तीन तालुक्यांतील २८ मंडळे),जळगाव (१४ तालुक्यांतील ६७ मंडळे), नंदुरबार (तीन तालुक्यातील १३ मंडळे), नाशिक (८ तालुक्यांतील ४६ मंडळे) कोल्हापूर (५ तालुक्यातील २० मंडळे),पुणे ( ६ तालुक्यांतील ३१ मंडळे). सांगली (६ तालुक्यातील ३७ मंडळे). सातारा (८ तालुक्यातील ६५ मंडळे),सोलापूर ७ तालुक्यातील ४६ मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.Dushkal Alert

दुष्काळी भागात काय सवलती मिळणार?

दुष्काळग्रस्तांच्या पीककर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी,रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता अशा सवलती देण्यात येणार आहेत.आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीजजोडणी खंडित न करणे या सवलतीही ९५९ महसुली मंडळांमध्ये देण्यात येणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment