Dushkal Anudan 2023 :- शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टरी इतके रुपये दुष्काळी अनुदान,जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

Dushkal Anudan 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.यंदा महाराष्ट्र राज्यात बऱ्याच भागांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.पाऊस कमी झाल्याने राज्यात चारा टंचाईचा तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.रब्बी हंगामात देखील बऱ्याच ठीकणी पेरण्याच झाल्या नाहीत.

शासन निर्णय Dushkal Anudan 2023

मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील 40 तालुके आणि उर्वरित तालुक्यांतील 1071 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील या दुष्काळ ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील शासनामार्फत काही सवलती देण्यात येणार आहेत.त्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ७००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

शेतकऱ्यांना किती मदत मिळणार?
Dushkal Anudan 2023

राज्यातील दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार आहे.या साठी राज्य सरकारच्या माध्यमातून ७ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या वर्गवारी नुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे.जिरायती जमिनीसाठी प्रती हेक्टरी ८५००/- रुपये,बागायती जमिनीसाठी प्रती हेक्टरी १७०००/- रुपये तसेच बहुवार्षिक आणि फळबागेसाठी २२,५००/- प्रती हेक्टरी आर्थिक मदत केली जाणार आहे.

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार १५००/- रुपये!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 8 सवलती

राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदती बरोबरच काही विशेष सवलती देखील दिल्या जाणार आहेत.या मध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.बँका तसेच इतर वित्तीय संस्थाच्या मार्फत शेती कर्जाचे केल्या जाणाऱ्या वसुलीस देखील स्थगिती देण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये 33.5 टक्के सूट देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना देखील मिळणार सवलत

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन फी माफ करण्यात आली आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.आवश्यक त्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात येणार आहेत.तसेच शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याची सवलत देखील देण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment