E Courts Services
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने बऱ्याच योजनांची माहिती नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे.त्यासाठी नागरिकांना आपल्या मोबाईलवरून अनेक योजनांची माहिती घरबसल्या मिळत आहे.आता देशातील सर्वच न्यायालयांमधील केसेस ची माहिती ऑनलाईन पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Table of Contents
आपण आपल्या नायालयीन खटल्याची माहिती जसे की पुढील तारीख,चालू तारखेला काय घडले इत्यादी माहिती ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरुनच जाणून घेऊ शकणार आहेत.तसेच आपल्या गावातील इतर न्यायालयीन खटल्यांची देखील माहिती आपल्याला ऑनलाईन पाहता येणार आहे.या मध्ये आपल्याला जिल्हा सत्र न्यायालय,सर्वोच्च न्यायालय या मधील माहिती मिळणार आहे.
मित्रांनो चला तर मग जाणून घेऊ या ऑनलाईन पद्धतीने आपल्या न्यायालयीन खटल्याची माहिती कशी जाऊन घ्यायची.
कसे चेक करायचे?E Courts Services
•यासाठी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
•यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मधील Google Play Store वर जाऊन e Courts Services हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.
•डाऊनलोड करून हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करायचे आहे.
•हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपण आपल्या केस चे ऑनलाईन स्टेटस् पाहू शकणार आहेत.
•आपल्याकडे आपल्या केसचा CNR Number असेल तर CNR NUMBER या पर्यायावर क्लिक करायचे आहे.आणि आपला CNR Number टाकून तुम्ही तुमच्या केसचे ऑनलाईन स्टेटस् पाहू शकणार आहेत.E Courts Services
•जर आपल्याकडे CNR Number नसेल तर Case Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•पुढे आपले राज्य आणि आपला जिल्हा निवडायचा आहे.
•मोबाईल स्क्रीन वरील Party Name या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
हे पण वाचा:- गाडीच्या नंबरवरून माहित करून घ्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता तेही तुमच्या मोबाईलवरून!
•आपली केस कोणत्या कोर्टात चालू आहे ते कोर्ट निवडायचे आहे जसे की District Court,High Court.
•आता आपल्याला Court Complex या पर्याया समोरील रकान्यात तुमची केस कोणत्या कोर्टात चालू आहे ते कोर्ट निवडायचे आहे.
•पुढे Petitioner/Respondant या पर्यायासमोरील रकान्यात आपले नाव किंवा आडनाव टाकायचे आहे.
•Registration Year या पर्यायासमोरील रकान्यात तुमची केस कोणत्या साली नोंद झाली ते वर्ष टाकायचे.(उदा.2018,2019…..)
•आता आपली केस जर सध्या न्यायालयात सुरू असेल तर Pending या पर्यायावर क्लिक करा.आणि जर केसचा निकाल लागला असेल तर Disposed या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•जर आपल्याला चालू आणि निकाल लागलेल्या अशा दोन्ही केसचे स्टेटस् पाहायचे असेल तर Both हा पर्याय निवडून Go बटणावर क्लिक करायचे आहे.E Courts Services
•आता आपल्या समोर बऱ्याच केसेस ओपन होतील त्यामधे तुमची केस कोणत्या कोर्टात सुरू आहे त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.जसे की Small Cause Court,Civil Court, District And Session Court, Chief Judicial Magistrate
मित्रांनो आपल्याला आपल्या न्यायालयीन केसचे ऑनलाईन स्टेटस् पाहण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये E Courts Services हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.