E Mojani Version 2 :- आता जमीन मोजणीसाठी एका क्लिकवर अर्ज करता येणार,जाणुन घ्या सविस्तर माहिती!

Spread the love

E Mojani Version 2

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.जमिनीची मोजणी करणे ही अत्यंत किचकट प्रक्रिया असून त्यासाठी पैसे भरण्यासाठी धावपळ करावी लागते.तसेच प्रत्यक्ष मोजणीसाठी देखील खूप प्रतीक्षा करावी लागते.यासाठी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात.हीच बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आल्याने आता शेतीची मोजणी करण्यासाठी राज्यभर एक नवीन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

काय आहे नवीन योजना?
E Mojani Version 2

महाराष्ट्र राज्य सरकारच्या भूमिअभिलेख विभागाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-मोजणी प्रकल्प राबविण्यात येत आहे.यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पुणे महसूल विभागातील ५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.यामध्ये पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुका,सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका,सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका,कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

वरील तालुक्यांतील शेतकऱ्यांना ई-मोजणी व्हर्जन 2 अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर लाभ मिळणार आहे.राज्यातील भूमिअभिलेख खात्यात मोजणीसाठीचे अर्ज अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत.तसेच शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत आहे.यासाठीच ई-मोजणी व्हर्जन 2 अंतर्गत शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेल्या रोव्हर खरेदीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नवीन रोव्हर खरेदीसाठी ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना जलद गतीने मोजणीची प्रक्रिया करून देणे यासाठी रोव्हर खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे.त्यासाठी नागरिकांकडून जास्तीत जास्त अर्ज यावेत, लवकरात लवकर अर्जावर कारवाई व्हावी तसेच नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत.तसेच या सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने ई मोजणी व्हर्जन 2 कार्यक्रम हाती घेतला आहे.

हे पण वाचा:- कोणाच्या नावावर किती एकर शेती आहे जाणून घ्या फक्त ५ मिनिटांत!

राज्यात सध्या फक्त पाच तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प शासन राबवित आहे.नागरिकांचा मिळणार प्रतिसाद आणि यामधून मिळणारी फळतृप्ती लक्षात घेऊन भविष्यात संपूर्ण राज्यभर सदरचा प्रकल्प राबविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

ई मोजणीसाठी अर्ज कुठे करायचा?
E Mojani Version 2

महाराष्ट्र राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागामार्फत शेतकऱ्यांना ई मोजणी साठी अर्ज करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.या पोर्टलच्या माध्यमातून आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ई मोजणीसाठी अर्ज करू शकणार आहेत.त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.

अर्ज करण्याची प्रक्रिया,आवश्यक कागदपत्रे तसेच इतर आवश्यक बाबी यांची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईट पोर्टलवर देणारच आहोत त्यासाठी तुम्हाला आमचा व्हॉट्स ऍप ग्रुप जॉईन करायचा आहे.जेणेकरून भविष्यात विविध योजनांच्या अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.

ई मोजणीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन होण्यासाठी.

Leave a comment