Ek Shetkari Ek DP Yojana
Ek Shetkari Ek DP Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्य सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे.त्यामुळे शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू मानला जातो.त्याकरिता राज्य शासन असो किंवा केंद्र शासन शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध योजना राबवित असते.
अशातच राज्य सरकारच्या विद्युत महामंडळाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा सरकारचा मानस आहे परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य नाही.
राज्यातील शेतकऱ्यांना कुठे कुठे 8 ते 10 तास वीजपुरवठा केला जातो.बऱ्याच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन हे एकाच ट्रान्सफॉर्मर (DP) वर असल्या कारणाने त्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. फ्युज मारणे,लिंक कट होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागते.
Ek Shetkari Ek DP Yojana
हीच शेतकऱ्यांची गरज ओळखून राज्य सरकारने एक शेतकरी एक डिपी योजना संपूर्ण राज्यभर सुरू केली. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना वेळेत आणि सुरळीत वीज पुरवठा करणे शक्य होईल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मोबाईल वरून अर्ज करता येणार
अर्ज करण्याकरिता तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.त्यासाठी येथे क्लिक करा
वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्ही तुमचा एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
अनुदान किती मिळते?
Ek Shetkari Ek DP Yojana
राज्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्रती एचपी सात हजार रुपये रक्कम भरावी लागते. तसेच शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति एचपी एवढ्या रक्कमेचा भरणा करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे
Ek Shetkari Ek DP Yojana
सदर योजनेमध्ये फक्त ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमिनीचा उतारा आही असेच शेतकरीच सहभागी होऊ शकतात.शेतीचा ७/१२ उतारा त्याचबरोबर ८अ आणि उताऱ्यामध्ये विहीर किंवा बोअर ची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे आधार कार्ड,पॅन कार्ड,रेशन कार्ड या कागदपत्रांची गरज भासते.
शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर त्या शेतकऱ्याचा जातीचा दाखला आवश्यक आहे.तसेच योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे बँक अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे.
वरील कागदपत्रांची पूर्तता करून आपण Ek Shetkari Ek DP Yojana करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.