Electricity Compensation News|तुमच्या शेतात विजेचा टॉवर उभारल्यास किंवा विजेची लाईन गेली असेल तर किती मोबदला मिळणार जाणून घ्या सविस्तर..

Spread the love

Electricity Compensation News

Electricity Compensation News:- शेतीच्या कामातील कष्ट कमी व्हावे म्हणून शेतीत आधुनिक बदल होत आहेत.शेतीला पाणी हे खूप महत्त्वाचे आहे परंतु तेच पाणी एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी पाइपलाइन ची गरज भासते तसेच पाणी उपसा करण्यासाठी लाईट ची देखील गरज आहे.आणि हीच लाईट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीतून लाईट चे टॉवर तसेच लाईन्स(तारा) टाकल्या आहेत.

हाच विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्रात महापारेषण(महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) तसेच इतर खाजगी मालकीच्या कंपन्यांनी विद्युत वाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे.

त्यासाठी पारेषण ने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारले आहेत.महापारेषण ने काही कायद्यांची निर्मिती देखील केली आहे.या कायद्या अंतर्गत जागा मालकाला किती मोबदला दिला जावा याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २०१० रोजी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या शेतजमिनीत ६६ ते ७६५ के. व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिनीसाठी टॉवर उभारले जात असेल आणि ती जमीन जर कोरडवाहू असेल तर टॉवर ने व्यापलेल्या क्षेत्रफळासाठी त्या भागातील जमिनीच्या सरकारी बाजारभावाच्या ( रेडिरेकनर दर) २५% मोबदला निश्चित करण्यात आला आहे.

तसेच ती जमीन तर बागायती किंवा फळबाग लागवडी खाली असेल तर मिळणारा मोबदला हा ६०% इतका निश्चित केला आहे.

यानंतर सरकारने २०१७ साली एक नवीन शासन निर्णय जाहीर केला ज्यानुसार टॉवर खालची जमीन आणि विजेच्या तारा खालील जमीन या साठी नवीन मोबदला धोरण जाहीर केले जे आजतागायत पर्यंत लागू आहे.

हे पण वाचा:- घरकुल योजनेच्या अनुदान रकमेत वाढ!

या नवीन धोरणानुसार ६६ ते ७६५ के. व्ही.क्षमतेच्या पारेषण वाहिण्यांसाठी उभारले जाणाऱ्या विद्युत टॉवर खाली येणारे क्षेत्र मोजले जाईल आणि त्या क्षेत्राला तुमच्या भागातील रेडिरेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जाईल.

सदर मोबदल्याची रक्कम ही शेतकऱ्यांना दोन टप्प्यात वितरित केली जाईल.पहिल्या टप्प्याचे वाटप हे टॉवर चे पायाभरणी केल्यानंतर दिले जाईल आणि दुसरे वाटप हे टॉवर चे काम पूर्ण झाल्यानंतर केले जाईल.

परंतु तुमच्या क्षेत्रात टॉवर उभारला गेला नसेल आणि फक्त लाईनच्या तारा जात असतील तर तुम्हालाही मोबदला मिळू शकतो.यामध्ये टॉवर टू टॉवर जोडण्यासाठी वायरची जी लाईन जाते तिला कॉरिडॉर असे म्हणले जाते.

तर या कॉरिडॉरच्या खाली जेवढी जमीन येते त्यासाठी
रेडिरेकनर दराच्या १५% मोबदला देण्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

ज्या जमिनीतून फक्त वीज वहिनीच्या तारा जातात त्यासाठीचा मोबदला हा वहिनी उभारल्यानंतर दिला जातो.

मोबदला मिळण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?
ज्या व्यक्तीच्या शेतात किंवा सर्व्हे नंबर मध्ये टॉवर उभारला जाणार आहे त्या संबंधित व्यक्तीला नोटीस दिली जाते.

परंतु काही कारणास्तव त्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकला नाही तर ती संबंधित व्यक्ती स्थानिक पारेषण मध्ये अर्ज करू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment