Electricity:- शेतकऱ्यांनो आपल्या मोटारीचे ऑटो स्विच काढा नाहीतर होणार कारवाई,महावितरणने दिली चेतावणी!

Spread the love

Electricity
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी वीज खूप महत्त्वाची आहे.शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहावे लागत आहे.राज्यात शेतीसाठी अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होत नाही.त्यामुळे वीजपुरवठा सुरू झाल्याबरोबर आपले विद्युत पंप लगेच सुरू व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी ऑटो स्विच बसविले आहेत.

ऑटो स्विच बसविल्यामुळे वीज पुरवठा सुरू झाला की लगेच विद्युत पंप देखील ऑटोमॅटिक सुरू होतात.सर्व विद्युत पंप एकाच वेळी सुरू झाल्याने रोहित्रावर अचानक विद्युतभार पडल्याने रोहित्र जळण्याच्या किंवा नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.त्याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर होत आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने शेतकऱ्यांना आपले ऑटो स्विच काढून ठेवण्यास सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी ऑटो स्विच ऐवजी कॅपॅसिटर बसविण्याचे आवाहन महावितरण विभागाकडून करण्यात आले आहे. महावितरण विभागा कडील आकडेवारीनुसार राज्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी ऑटो स्विच बसविले आहेत.ऑटो स्विच मुळे विद्युत दाब(Electricity) निर्माण होऊन फ्युज उडतो किंवा रोहित्र जळते.याचा परिणाम शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो.रोहित्र जळाल्याचा परिणाम शेतातील पिकांवर होऊ शकतो.

हे पण वाचा:- राज्यात महावितरण सोलर पंप वाटप योजना सुरू,अर्ज करणाऱ्या पहिल्या १ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

महावितरण विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद न दिल्यास सदर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येणार आहे.अथवा महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.यासाठी महावितरण कडून एका विशेष तपासणी पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ऑटो स्विच काढून कॅपॅसिटर लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी ऑटो स्विच ऐवजी कॅपॅसिटर वापरल्याने वीज पुरवठा सुरळीत होतो तसेच रोहित्रावर कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही. शेतकऱ्यांना कॅपॅसिटर बसविण्यासाठी ५०० रुपयांचा खर्च येणार आहे.परंतु यामुळे रोहित्र जळण्याच्या किंवा नादुरुस्त होण्याच्या घटना कमी होणार आहेत.तसेच वीज पुरवठा देखील सुरळीत होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment