Emergency Call:- संकटात आहेत? तर मग आपल्या मोबाईलवरुन डायल करा हेल्पलाईन नंबर ११२ आणि १४ मिनिटांत मदत मिळवा!

Spread the love

पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना संकटकाळी तत्काळ मदत मिळावी यासाठी डायल ११२ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सुविधेमुळे संकटात असलेल्या हजारो लोकांनी आजपर्यंत मदत मिळवली आहे.पोलिस प्रशासनाकडून तातडीची मदत पोहोचविण्यात येते.

डायल ११२ या सुविधेसाठी मागील ११ महिन्यांपासून जवळपास ४७ हजार लोकांनी कॉल केलेले आहेत.विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स पोलिस प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत.त्यामुळे पोलिस प्रशासनाने करावे तेवढे कौतुक कमीच आहे.विशेष बाब म्हणजे कॉल करणाऱ्या व्यक्तीला सरासरी १४ मिनिटांमध्ये मदत मिळाली आहे.

काय आहे डायल ११२ सुविधा?
सर्वसामान्य नागरिकांना काही संकटे सामोरे आली किंवा सुरक्षेचा काही प्रश्न उभा राहिला तर अशा वेळेस पोलिस प्रशासनाची मदत हवी असल्यास डायल ११२ ही सुविधा संबंधित व्यक्तिला मदत पुरविते.त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची काही मदत हवी असल्यास डायल ११२ वर कॉल करू शकता.

आपण डायल ११२ वर कॉल केल्यास आपल्या जवळीक पोलिस चौकीला याबद्दलची माहिती दिली जाते.आणि संबंधित पोलिस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी आपल्या मदतीसाठी दाखल होतात.पोलिस अधीक्षक कार्यालयात यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे.या कक्षाच्या माध्यमातून डायल ११२ ची सुविधा पुरविली जाते.अलीकडे ग्रामीण भागांमध्ये या हेल्पलाइनची मदत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

डायल ११२ या हेल्पलाईन सुविधेची मदत संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना मोटर सायकल आणि चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.या वाहनांना एमडीटी यंत्रे बसविण्यात आली आहेत.या हेल्पलाईन नंबरवर कॉल येताच नियंत्रण कक्षातून संबंधित पोलिस ठाण्यांना माहिती दिली जाते. आणि त्यानंतर घटनास्थळी तत्काळ मदत पाठवली जाते.आजवर या हेल्पलाईन नंबरवर कॉल करणाऱ्या व्यक्तींना सरासरी १४ मिनिटांत मदत दाखल झालेली आहे.

महिला वर्गासाठी तर ही सुविधा वरदान ठरत आहे. महिलांच्या छेडछाडीच्या तसेच अपराधाच्या तक्रारी हेल्पलाईन नंबरवर कळताच ताबडतोब मदत केली जात आहे.तरीदेखील महिलांमध्ये या हेल्पलाईन नंबर विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment