शेतकऱ्यांनो हे काम करा,एकरी 50 हजार रुपये कमविण्याची संधी,पहा काय करायचे त्यासाठी?

Spread the love

Farmer Scheme
भारत हा कृषीप्रधान देश आहे.तसेच महाराष्ट्र देखील एक शेती प्रधान राज्य आहे.राज्यातील शेतकरी आपला दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी शेती हा व्यवसाय करत असतात. यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात.जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि त्यातून त्यांची आर्थिक समृद्धी व्हावी हाच उद्देश यामागे असतो.

मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी ही योजना सुरू केली होती.ही योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभर ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेच्या अंतर्गत वीज सब स्टेशन जवळ असणाऱ्या शेत जमिनींवर सौर प्रकल्प विकसित केले जाणार आहेत.जेणेकरून या प्रकल्पांच्या माध्यमातून वीज निर्मिती होईल आणि ती सब स्टेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज उपलब्ध होईल असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,आता 3.50 लाख रुपयांचा कृषी सोलर पंप मिळणार फक्त 12 हजार रुपयांत,अर्ज कुठे करायचा?जाणून घ्या सविस्तर!

या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्या बरोबरच त्यांना एक उत्पन्नाचा स्त्रोत देखील मिळणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ज्या शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या जाणार आहेत अशा शेतकऱ्यांना त्या जमिनींचा मोबदला देखील मिळणार आहे.योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारकडून भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना एक निश्चित रक्कम मिळणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सब स्टेशन पासून ३ किलोमीटर परिघात असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहेत.यासाठी शेतकऱ्यांकडे किमान ३ एकर ते १० एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना वार्षिक भाडे तत्वावर मोबदला दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या जमिनिंसाठी सुरुवातीला वार्षिक प्रती एकरी ३० हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते.परंतु नंतर या मध्ये बदल करून सध्या शेतकऱ्यांना प्रती एकर ५० हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.या योजनेमुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे.त्यांना दिवसा वीज देखील उपलब्ध होणार आहे तसेच एकरी ५० हजार रुपयांपर्यंतची कमाई देखील करता येणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

शेतकरी मित्रांनो या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment