Gay Gotha Anudan
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठ्याची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड व खाचखळग्यानी भरलेली असते,सदरचे गोठे हे क्वचितच व्यवस्थितरित्या बांधले जातात.
गोठयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचे शेण व मूत्र पडलेले असते तसेच पावसाळयाच्या दिवसांत गोठयातील जमिनीस दलदलीचे स्वरुप प्राप्त होते व सदर जागेतच जनावरे बसत असल्यामुळे ते विवीध प्रकारच्या आजारांना बळी पडतात.
तसेच काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात.तर काही वेळेस गाई/म्हशींची कास निकामी होते,त्यांच्या शरीराच्या खालील बाजूस जखमा होतात.बऱ्याच ठिकाणी जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी बांधलेल्या नसतात.त्यांच्यापुढील मोकळया जागेवरच चारा टाकला जातो.
या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्याने जनावरे चारा खात नाही व हा चारा वाया जातो.हे टाळण्यासाठी जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांना चारा व खाद्य देण्यासाठी गव्हाण बांधणे अत्यावश्यक आहे.
गाय गोठा अनुदान योजना
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने रोजगार हमी योजनेतून ६ गुरांकरिता गोठा बांधण्यासाठी ७७,१८८/- रुपये अनुदान देण्यात येणार आहे.या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना २६.९५ चौ.मी. जमीन पुरेशी आहे.तसेच त्याची लांबी ७.७ मी.आणि रुंदी ३.५ मी. असावी.गव्हाण ७.७ मी. x ०.२ मी. x ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात यावे.जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात यावी.
सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन,वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.