Gharkul Yojana List Download
Gharkul Yojana List Download
देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार विविध लोक कल्याणकारी योजना राबवत असते.देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावे आणि नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा योजनांच्या मागचा मुळ हेतू असतो.देशातील नागरिकांना चांगले पक्के घर मिळावे याकरिता मागच्या सरकारच्या काळात इंदिरा आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली.पुढे जाऊन याच योजनेचे नाव बदलून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले.
Gharkul Yojana List Download
प्रधानमंत्री आवास योजनेची उद्दिष्ट्ये
आपल्या देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी या योजने अंतर्गत बेघर तसेच कच्चे बांधकाम असलेल्या देशातील नागरिकांना 2022 पर्यंत पक्के घर देण्याचे अभियान सुरू केले.अजून पर्यंत उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी सदर योजने अंतर्गत देशातील नागरिकांना योजनेचा लाभ मिळत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील अनेक नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
Table of Contents
कोणाला मिळणार लाभ?
आपण देखील या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता अर्ज केला असेल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे.कारण ज्या नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत त्यांच्याकरीता सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर केली आहे.
Gharkul Yojana List Download
ग्रामपंचायतनुसार नवीन घरकुल यादी जाहीर
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले होते.त्याच बरोबर जे लाभार्थी सर्व अटी आणि नियम तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली असेल अशा लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी मिळणार प्रत्येकी 2500/- रुपये
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या अर्जदारांची नावे ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या यादी मध्ये असतील अशा अर्जदारांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.त्याच बरोबर ज्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे चौकशी करून आपले अर्ज दाखल करावयाचे आहेत.
How to Download Gharkul Yojana List
नवीन घरकुल यादी कशी डाऊनलोड करावी?
1)नवीन घरकुल यादी डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.घरकुल यादी वेबसाईट येथे क्लिक करा
2)आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेज वरील उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात 3 रेषा दिसतील त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
3)पुढे आपल्या समोर बरेच पर्याय ओपन होतील त्यातील Awaasaoft या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
4)त्यानंतर आपल्याला Reports पर्यायावर क्लिक करायचे आहे.
5)एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपल्याला हव्या असलेल्या माहितीच्या पर्यायावर क्लिक करून पाहिजे ती माहिती आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
6)त्याकरिता आपल्याला आपले राज्य,जिल्हा,तालुका आणि ग्राम पंचायत निवडायची आहे.
7)तुमच्या गावात मंजूर झालेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी आपण आपल्या मोबाईल मध्ये पाहू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.