Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपये अनुदान,असा करा अर्ज!

Spread the love

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत काही बदल करून या योजनेला आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे नाव दिले आहे.

काय आहे योजना?Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विशेषतः पाण्यात बुडून मृत्यू होणे,कीटकनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे,उंचावरुन पडून झालेला अपघात,सर्पदंश व विंचूदंश,नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या,जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू,दंगल,अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस /त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता शासनाकडून रु. २ लाख पर्यंत लाभ देण्यात येतो.सदर सुधारित योजने अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकुण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

अपघाताचे समविष्ट केलेले प्रकार Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah Anudan

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

१)रस्ता/रेल्वे अपघात
२)पाण्यात बुडून मृत्यू
३)जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
४)विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात.
५)वीज पडून मृत्यू
६)खून
७)उंचावरुन पडून झालेला अपघात
८)सर्पदंश व विंचुदंश
९)नक्षलाईटकडून झालेल्या हत्या
१०)जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू
११)बाळंतपणातील मृत्यू
१२)दंगल
१३)अन्य कोणतेही अपघात,या अपघातांचा समावेश असेल.

योजनेमध्ये अपात्र असलेले अपघाताचे प्रकार Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

१)नैसर्गिक मृत्यू
२)विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व
३)आत्महत्येचा प्रयत्न,आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे.
४)गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात
५)अंमली पदार्थाच्या अमलाखाली असतांना झालेला अपघात
६)भ्रमिष्टपणा
७) शरीररांतर्गत रक्तस्त्राव
८)मोटार शर्यतीतील अपघात
९)युध्द
१०)सैन्यातील नोकरी
११)जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश असणार नाही.

अपघातामुळे मिळणारा लाभ

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या अंतर्गत वारसाला २ लाख रुपये अनुदान दिले जाते.अपघातामुळे शेतकऱ्याचे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये अनुदान मिळते.अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये अनुदान दिले जाते.तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान वारस असणाऱ्या व्यक्तीला सरकारच्या माध्यमातून दिले जाते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

१.७/१२ उतारा
२.पोलिस FIR कॉपी
३.मृत्यचा दाखला
३.शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठयाकडील गाव नमुना नं.६-क नुसार मंजूर झालेली वरासाची नोंद.
४.शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड/निवडणूक ओळखपत्र. किंवा ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.
५.प्रथम माहिती अहवाल/स्थळ पंचनामा/पोलिस पाटील माहिती अहवाल
६.मृत्यूचे कारण कळावे याकरिता पोस्ट मोर्टेम अहवाल.

हे पण वाचा:- आता 436 रुपयांचा विमा उतरविल्यास मिळणार 2 लाख रुपये!

अर्ज कुठे करायचा? Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे वारसदार यांनी निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसांच्या आत सदर करावा.यासाठी आपल्याला कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी किंवा कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी वारसदराची निवड कशी केली जाते?

१)अपघातग्रस्ताची पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती
२)अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी
३)अपघातग्रस्ताची आई
४)अपघातग्रस्ताचे वडील
५)अपघातग्रस्ताची सून
६)अन्य कायदेशीर वारसदार

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment