Government Schemes:- सरकारकडून प्रत्येक महिन्याला मिळणार 5 हजार रुपये पेन्शन,पहा कुठे करायचा अर्ज?

Spread the love

Atal Pension Yojana
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात.या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना अर्थसहाय्य करणे हाच उद्देश सरकारचा असतो.अशीच एक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबविली जात आहे,ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला जात आहे.केंद्र सरकारची ही नेमकी कोणती योजना आहे?कशी कार्य करते?त्यासाठी कुठे अर्ज करायचा?याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना दरमहा पेन्शन देण्यात येते.परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी अशी कोणतीच तरतूद यापूर्वी करण्यात आलेली नव्हती परंतु आता सर्वसामान्य नागरिकांना तसेच तुम्हालाही प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळू शकते.यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्य व्यक्तींना त्यांच्या भविष्यासाठी मासिक पेन्शन मिळावी यासाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून २०१५ साली सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला कमीत कमी १००० रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे सहभागी होणाऱ्या व्यक्तींना भविष्यासाठी हा एक चांगला पर्याय असणार आहे.

हे पण वाचा:- आता उसने पैसे मागण्यासाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही,फोन पे आणि गूगल पे वरून मिळणार पैसे,व्याज पण लागणार नाही,किती पैसे मिळणार?वाचा संपूर्ण माहिती!

अटल पेन्शन योजने बद्दल महत्त्वाच्या गोष्टी!

अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय हे १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत भरावी लागणार आहे.ज्या दिवशी तुम्हाला वयाची साठ वर्षे पूर्ण होतील त्या महिन्यापासून तुम्ही जिवंत असेपर्यंत प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी तुमचे बँक खाते राष्ट्रियकृत बँकेत असणे गरजेचे आहे.तिथे तुम्ही अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.आणि आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.

Leave a comment