Gram Panchayat Election :- ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी काय पात्रता असते?घ्या जाणून !

Spread the love

Gram Panchayat Election


नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.ग्रामपंचायत ही लोकशाहीचा पाया आहे.महाराष्ट्रात बऱ्याच ग्रामपंचायतींच्या इलेक्शन साठी बिगुल वाजला आहे.ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी गावागावात बऱ्याच उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतून गावाच्या सरपंचाची निवड केली जाते.आता ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड ही जनतेतून केली जात आहे.बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की सरपंच पदासाठी काय पात्रता लागते.आज आपण या लेखामधून ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी आवश्यक पात्रता
Gram Panchayat Election

१.ज्या उमेदवाराला ग्रामपंचायत इलेक्शन लढवायचे आहे त्याचे वय किमान 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

२.संबंधित उमेदवाराचे नाव गावाच्या मतदार यादी मध्ये असणे आवश्यक आहे.

३.उमेदवारावर कोणत्याही कायद्यानुसार पात्रता अभवाची कारवाई झालेली नसावी.

४.उमेदवाराला 2000 सालानंतर दोनच अपत्य असणे आवश्यक आहे.

५.उमेदवाराला २००० सालानंतर तिसरे अपत्य झाले असेल तर निवडणूक लढविता येणार नाही.

६.उमेदवार किमान इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

७.उमेदवार राहतो त्या घरात शौचालय असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:- राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला,दिवाळीत होणार मतदान

खालील व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाहीत.
Gram Panchayat Election

१.ज्या व्यक्तींकडे ग्राम पंचायत,पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची कोणतीही थकबाकी असेल ती व्यक्ती.

२.ज्या व्यक्तीला 6 महिन्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली असेल आणि कारावासातून मुक्त झाल्यापासून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नसेल.

३.जे व्यक्ती राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरणाचे कर्मचारी असतील

४.ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेले असेल.

५.ज्या व्यक्तीला भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाच्या मुद्द्यावरून पूर्वी अपात्र ठरविले असेल.

६.जे व्यक्ती जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य आहेत.

अशा व्यक्ती ग्राम पंचायत इलेक्शन लढवू शकत नाहीत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment