Gram Panchayat Fund:- तुमच्या ग्रामपंचायतला किती निधी आला आणि किती निधी खर्च केला? अशा पद्धतीने घरबसल्या जाणून घ्या तुमच्या मोबाईलवरून!

Spread the love

Gram Panchayat Fund
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.भारत हा लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे.शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भारतात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे.पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत ही शेवटची ग्राम व्यवस्था आहे.

शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामपंचायत करत असते.गावातील नागरिकांसाठी विविध लाभाच्या योजना देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविल्या जातात.गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत करते.

राज्य सरकारच्या माध्यमातून देखील ग्रामपंचायत साठी भरघोस निधीची पूर्तता केली जाते.यासाठी ग्रामपंचायतीला ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात गावाच्या विकासासाठी किती निधीची आवश्यकता आहे यासाठी अंदाजपत्रक तयार करावे लागते.तयार केलेले अंदाजपत्रक पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावे लागते.

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचे विकास आराखडे मंजुरीसाठी राज्य सरकारला पाठविले जातात. राज्य सरकारच्या वतीने आरखड्या प्रमाणे ग्राम पंचायतीला निधीची मंजुरी दिली जाते.मंजूर झालेला निधी ग्रामपंचायत कडे वर्ग करण्यात येतो.

राज्य सरकारच्या वतीने मंजूर केलेला निधी ग्रामपंचायत आवश्यक त्या गोष्टींवर करते.परंतु सर्वसामान्य नागरिकांना आपल्या ग्रामपंचायतीला(Gram Panchayat Fund) किती निधी आला? आणि तो कोणत्या कामांसाठी खर्च केला गेला याची माहिती नसते.परंतु आता आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ग्रामपंचायत साठी किती निधी आला आणि त्यापैकी किती खर्च केला? याची माहिती जाणून घेता येणार आहे.

हे पण वाचा:- आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळणार तुमच्या मोबाईलवरून,वेळेची आणि पैशांची होणार बचत!

ग्रामपंचायतने खर्च केलेला निधी अशा पद्धतीने जाणून घ्या
Gram Panchayat Fund

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल २०२० रोजी पंचायत राज दिनाच्या दिवशी ई ग्राम स्वराज हे मोबाईल ॲप्लिकेशन लाँच केले आहे.या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्रामपंचायत मधील विकास कामे,शासनाने मंजूर केलेला निधी,ग्रामपंचायत मार्फत कोणत्या बाबींवर किती निधी खर्च झाला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया आपल्या ग्रामपंचायतीने कोणत्या कामांसाठी किती पैसा खर्च केला?

१.तुमच्या मोबाईल मधील Google Play Store वर जाऊन e Gram Swaraj (ई ग्राम स्वराज) हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.

२.डाऊनलोड झाल्यानंतर इंस्टॉल करून ओपन करा.

३.ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल तिथे आपले राज्य,जिल्हा परिषद,ब्लॉक पंचायत आणि तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे.

४.वरील माहिती निवडल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

५.आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे वरील बाजूस तुम्हाला तुम्ही निवडलेली सर्व माहिती दिसेल.

६.आता Financial Year या पर्यायासमोरील रकान्यात तुम्हाला ज्या आर्थिक वर्षाची माहिती पाहिजे ते वर्ष निवडायचे आहे.

७.तुम्हाला आता तीन वेगवेगळे पर्याय दिसतील यातील पहिला पर्याय ER Details (इलेक्टेड रीप्रेझेंटिव्ह) या पर्यायमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत प्रतिनिधी यांची माहिती असते.

८.या पर्यायावर क्लिक करून तुम्ही गावचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची माहिती घेऊ शकता.

९.त्यानंतर तुम्हाला Approved Activities (ॲप्रूव्हड ॲक्टिविटीज) या नावाचा दुसरा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला ग्रामपंचायतीने तयार केलेला विकास आराखडा याची माहिती मिळेल.

१०.त्यानंतरचा तिसरा पर्याय Financial Progress (आर्थिक उन्नती) हा आहे.या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या आर्थिक वर्षात तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आणि त्यापैकी किती खर्च झाला याची माहिती मिळते.

११.यामध्ये तुमच्या गावाला मिळालेल्या निधीची रक्कम Receipt (रीसिप्ट) या पर्यायासामोर तुम्हाला दिसेल.तसेच किती निधी खर्च झाला याची माहिती Expenditure (एक्सपेंडेचर) या पर्यायासमोर तुम्हाला दिसेल.

१२.त्यानंतर खाली List Of Schemes लिस्ट ऑफ स्कीम या पर्यायाच्या खाली ग्रामपंचायतीने कोणत्या योजनेसाठी किती निधी खर्च केला याची माहिती तुम्हाला सविस्तर पणे दिसणार आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीला मंजूर झालेला निधी तसेच ग्रामपंचायतीने कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला याची माहिती तुमच्या मोबाईलवरून जाणून घेऊ शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment