Havaman Andaj:- राज्यात 16,17,18 ऑक्टोबर रोजी या जिल्ह्यात पडणार पाऊस,वाचा सविस्तर!New Havaman Andaj

Spread the love

Havaman Andaj

Havaman Andaj
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात गतवर्षीच्या तुलनेत पाऊस खूप कमी प्रमाणात पडला आहे.गणपती उत्सवामध्ये वरुणराजाने चांगली हजेरी लावली होती.परंतु नंतर मात्र अचानक गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राज्यातील बऱ्याच भागांमध्ये रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.त्यामुळे शेतकरी राजा आता आभाळाकडे डोळे लावून पाहत आहे.अशातच हवामान विभागाने दिलासा देणारी बातमी दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येत आहे.यामुळे सर्व नागरिक हैराण झाले आहेत.ऑक्टोबर हीट आणि बदलत्या तापमानामुळे विविध व्हायरल आजार डोके वर काढत आहेत.

हे पण वाचा:- नमो शेतकरी योजनेसाठी 1720 कोटी रुपये मंजूर

भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर असच हवामान रहाणार आहे.असा अंदाज व्यक्त केला आहे.तसेच ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना अनेक त्रास जाणवू शकतात त्यासाठी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी तसेच ऑक्टोबर हिटमुळे हैराण असलेल्या नागरिकांसाठी पावसाबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे.चला तर मग जाऊन घेऊ या.

पंजाबराव डख हवामान अंदाज
Havaman Andaj

पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात विविध भागांमध्ये नवरात्र उत्सवाच्या काळात पाऊस पडणार आहे.तसेच या अगोदर पंजाबराव डख यांनी सुरुवातीला दिलेल्या अंदाजानुसार नवरात्र उत्सवामध्ये राज्यात कुठेच पाऊस पडणार नसल्याचे देखील सांगितले होते.

आता मात्र पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यातील विविध भागांमध्ये दिनांक 16,17 आणि 18 ऑक्टोबर रोजी मेघ गर्जेनेसह जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगितले.तसेच 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सातारा,सांगली,कोल्हापूर,सावंतवाडी, देवगड आणि कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी दिला आहे.

पंजाबराव डख हवामान अंदाज
Havaman Andaj Today

या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.तसेच उर्वरित महाराष्ट्रात 25 ऑक्टोबर पर्यंत हवामान ढगाळ राहणार आहे.तसेच 25 ऑक्टोबर नंतर हवामानामध्ये बदल होऊन नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment