Havaman Andaj Today:- कोल्हापूर शहर परिसरात पहाटेपासून पडतोय मुसळधार पाऊस, या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता!

Spread the love

Havaman Andaj Today
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.मागील महिन्यात ऑक्टोबर हीटने सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले होते.राज्यात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने उन्हाळ्या सारखे वातावरण तयार झाले होते.परंतु नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीची चाहूल सुरू झाली होती.

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा खाली चालला होता.अशातच परत मागील ३ ते ४ दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे ऐन दिवाळीत राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.

हे पण वाचा:- हवामान विभागाचा नवीन हवामान अंदाज,या ठिकाणी पडणार पाऊस!

आज ९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर शहर तसेच परिसरात पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Havaman Andaj Today)सांगितला आहे.

राज्यातील सातारा,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तसेच विदर्भात १० नोव्हेंबरपासून थंडी मध्ये वाढ होईल,असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment