जानेवारी ते मार्चच्या दरम्यान कशी असेल पावसाची स्थिती,हवामान विभागाचा काय आहे अंदाज! Havaman Andaj

Spread the love

Havaman Andaj
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या ११२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.त्यामुळे महाराष्ट्रासह देशाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,जानेवारी ते मार्च, या तीन महिन्यांत देशात सरासरी ६९.७ मिमी पाऊस पडतो.यंदा सरासरीच्या ११२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.महाराष्ट्रातही या काळात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान,हिवाळ्यात डिसेंबरअखेर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे,पुढील काळातही तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे.जानेवारी महिन्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा:- राज्यातील या 22 जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता,जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज!

एल-निनो मार्चपर्यंत सक्रिय

प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती मार्चअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे एकूण तापमानात वाढीचा कल कायम राहणार आहे.२०२३ मध्ये देशाचे तापमान सरासरीपेक्षा ०.६५ अशांनी जास्त नोंदविले गेले आहे.

या अगोदर २०१६ मध्ये सरासरी तापमान ०.७१ अंशांनी जास्त नोंदविले गेले होते.सध्या सक्रिय असलेली हिंद महासागरीय द्विध्रुविता हळूहळू निष्क्रीय होण्याचा अंदाज आहे.

बिगरमोसमी पाऊस कमीच

मोसमी वारे माघारी गेल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशात सरासरी ११०.७ मिमी पाऊस पडला आहे,तो सरासरीच्या ९१ टक्के आहे.राज्यात बिगरमोसमी पाऊस ९६.४ टक्के झाला आहे.राज्यात सरासरी ५९.३ मिमी बिगर मोसमी पाऊस पडतो.फक्त डिसेंबर महिन्यात राज्यात सरासरी ६.१ मिमी पाऊस पडला आहे,जो डिसेंबर महिन्याच्या सरासरीच्या ३३ टक्के अधिक आहे.राज्यात सरासरी ४.६ मिमी पाऊस पडतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment