राज्यातील या 22 जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता,जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज!

Spread the love

Maharashtra Rain Alert
आज १ जानेवारी पासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे.नवीन वर्षाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता.परंतु तसे झाले नाही.मात्र आता नवीन हवामान अंदाजानुसार राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्य आणि आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटी देखील अवकाळी पाऊस होणार असल्याचे सांगितले होते.परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावली नाही.उलट डिसेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील हवामान कोरडे असल्याचे पाहायला मिळाले.पण आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात अवकाळी पावसाने होणार असे हवामान विभागाने सांगितले आहे.

भारताच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यातील तब्बल २२ जिल्ह्यांमध्ये हा अवकाळी पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार अवकाळी पाऊस?

भारतच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ,मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागातील २२ जिल्ह्यांमध्ये एक ते सात जानेवारी दरम्यान काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व १७ जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील नागपूर,अमरावती,भंडारा,गोंदिया आणि गडचिरोली या ५ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

तसेच या कालावधीमध्ये राज्यातील मराठवाडा विभागातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजामुळे मध्य महाराष्ट्र,कोकण आणि विदर्भातील शेतकऱ्यांची यामुळे चिंता वाढणार आहे.तसेच या अवकाळी पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो.यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment