Home Loan:- शहर असो किंवा खेडे इथे प्रत्येकाला घर घ्यायचे असते.पुणे शहरासारख्या ठिकाणी चांगल्या भागामध्ये 2BHK घर घ्यायचे असेल तर 50 ते 60 लाख रुपयांचे बजेट लागते.एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तिला एवढी रक्कम एकाच वेळेस भरून घर खरेदी करणे शक्य नसते.त्यासाठी ते बँक लोनचा पर्याय स्वीकारतात आणि आपल्या महिन्याला मिळणाऱ्या पगारातून किंवा कमाईतून EMI भरत असतात.घराचे संपूर्ण हप्ते परतफेड करण्यासाठी आयुष्याची निम्मी वर्षे निघून जातात.
जवळपास 80-85 टक्के मध्यमवर्गीय मंडळी याच फेजमधून जात असतात.त्यांना घर घेण्यासाठी गृहकर्जाचाच पर्याय निवडावा लागतो.मग कधी कधी मनात विचार येतो भाड्याने राहिले तर योग्य आहे का?परंतु एसआयपी सारख्या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक केली तर मात्र तुम्हाला तुमच्या घराची जवळपास किंमत वसूल करण्यासाठी मदत होते.
गृहकर्जाची रचना किंवा गणित समजून घ्या
समजा तुम्ही 60 लाख रुपये किंमतीचे घर घेण्यासाठी 48 लाख रुपये (80%) गृहकर्ज घेतले आहे आणि 20 वर्षांसाठी परतफेड केली आहे.जर तुम्हाला हे गृहकर्ज 8.5 टक्के दराने मिळाले असेल, तर तुम्हाला 20 वर्षे प्रत्यके महिन्याला 41,656 रुपये EMI भरावा लागेल.येथे पुढील 20 वर्षे व्याजदर समानच राहील असे गृहीत धरले आहे. मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 48 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 51,97,324 रुपये इतके व्याज द्यावे लागणार आहे.म्हणजेच तुम्हाला एकूण 99,97,324 रुपये परतावा भरावा लागणार आहे.
SIP मधून हे पैसे कसे वसूल करायचे?त्याचे गणित समजून घ्या
तुम्हाला तुमच्या घराची किंमत वसूल करण्यासाठी तुम्हाला मुच्यअल फंड किंवा एसआयपी मध्ये एक ठराविक गुंतवणूक करावी लागणार आहे.तुमच्या गृहकर्जाचे(Home Loan) हप्ते जेव्हा पासून सुरू होणार आहेत तेव्हापासून तुम्हाला एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची आहे.मग तुमच्या घराची किंमत वसूल करण्यासाठी तुम्हाला एसआयपी मध्ये प्रत्येक महिन्याला किती पैसे गुंतवावे लागतील हा प्रश्न पडतो.
प्रत्येक महिन्याला किती पैसे SIP मध्ये भरावे?Home Loan
तुम्हाला तुमच्या घराची किंमत वसूल करण्यासाठी साधारणपणे तुमच्या मासिक हप्त्याच्या 20-25 टक्के रक्कम SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल.वरती दिलेल्या गृहकर्जाच्या रकमेवरून आपण SIP रक्कम काढुया.जर तुम्ही महिन्याला गृहकर्जापोटी महिन्याला 41,656 रुपये EMI भरत असाल तर त्याच्या 25 टक्के म्हणजेच 10414 रुपये प्रत्येक महिन्याला SIP मध्ये टाकू शकता.जर तुम्हाला सरासरी 12 टक्के वार्षिक व्याज मिळू शकते.अशा प्रकारे,तुम्ही 20 वर्षात 24,99,360 रुपये SIP मध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत.20 वर्षानंतर तुम्हाला SIP मधून एकूण 1,04,05,126 रुपये मिळणार आहेत.
एसआयपीचा फायदा कसा होतो?
तुम्ही तुमच्या गृहकर्जासह 20 वर्षांसाठी SIP सुरू केल्यास तुम्हाला त्याचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.तुम्ही 20 वर्षांसाठी 8.5 टक्के व्याज दराने 48 लाख रुपये गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला 41,656 रुपये EMI भरावा लागेल.त्यामुळे तुम्ही 20 वर्षात एकूण अंदाजे 99,97,324 रुपये भरणार आहेत.तसेच याच 20 वर्षांत तुम्ही जर महिन्याला अतिरिक्त 10,414 रुपये SIP मध्ये गुंतविले तर तुम्ही एकूण 24,99,360 रुपये अतिरिक्त भराल परंतु तुम्हाला त्याच SIP मधून 20 वर्षांनंतर एकूण 1,04,05,126 रुपये मिळणार आहेत.
तुमच्या घराची किंमत किती आहे?
तुम्ही गृहकर्ज घेऊन 20 वर्षांत एकूण 99,97,324 रुपये EMI रक्कम आणि SIP पोटी एकूण 24,99,360 रुपये असे मिळून एकूण 1,24,96,684 रुपये तुमची गुंतवणूक होईल.तुम्हाला तुमच्या SIP मधून 20 वर्षानंतर एकूण 1,04,05,126 रुपये परतावा मिळणार आहे.म्हणजेच तुमच्या घराची प्रभावी किंमत 20,91,558 रुपये होईल.म्हणजेच तुम्ही गृहकर्जासोबत SIP सुरू केल्यास 60 लाख रुपयांचे घर तुम्हाला फक्त 32.91 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे.यामध्ये तुम्ही घर खरेदी करताना स्वतःच्या खिशातून गुंतवणूक केलेल्या 12 लाख रुपयांचा देखील समावेश आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.