Honda Activa Electric:- बाजारात येत आहे होंडाची ॲक्टिवा इलेक्ट्रिक,एका चार्जवर २८० किमी धावणार, जाणून घ्या किंमत!

Spread the love

Honda Activa Electric


नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती काही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.तसेच देशातील वाढते प्रदूषण सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत आहे.त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या इलेक्ट्रिक बाईक तसेच गाड्या खरेदीकडे लोकांची ओढ लागली आहे.

इलेक्ट्रिक बाईक पर्यायाने पेट्रोल आणि डिझेल पेक्षा कमी बजेट मध्ये धावतात तसेच त्या पर्यावरणपूरक असल्याने सरकार देखील लोकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे. भारतात नवाजलेली होंडा कंपनी देखील आता इलेक्ट्रिक क्षेत्रात आपले पाऊल टाकत आहे.लवकरच होंडा कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करण्याचा विचार करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आगामी काही वर्षांत होंडा कंपनी 10 इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे.त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे समजते.आता ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 दरम्यान होंडा कंपनी आपकी दोन उत्पादने लाँच करणार आहे,त्यापैकी एक Honda Activa Electric Bike असल्याचा अंदाज आहे.

Honda Activa Electric वैशिष्ट्ये?

होंडा ॲक्टीवा इलेक्ट्रिक बाईक मध्ये 60 व्होल्टेज असलेली लिथियम आयन ची बॅटरी असणार आहे. बॅटरी संपूर्णपणे चार्जिंग होण्यासाठी सहा तासांचा वेळ लागणार आहे.तसेच मोबाईल ॲप्लिकेशन सपोर्ट देखील असणार आहे.तुम्ही त्यामध्ये गाणी देखील ऐकू शकणार आहेत.

इलेक्ट्रिक बाईक मध्ये LED हेडलाईट्स,पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,तीन रायडिंग मोड असणार आहेत. याशिवाय क्रुझ कंट्रोल,मुझ्यिक प्लेअर,युएसबी चार्जर पोर्ट देखील असणार आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,खतांसाठी मिळणार सबसिडी !

बाईकची किंमत किती असणार?

होंडा ॲक्टिवाचे आताचे पेट्रोल मॉडेल सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकच्या यादीत आहे.त्यामुळे त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील ग्राहकांना परवडणाऱ्या दरात असणार आहे. काही तज्ञांनी दावा केला आहे की होंडा ॲक्टिवा बाईकची किंमत ही 1 लाख 10 हजार रुपये असू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment