जर तुम्ही फक्त २० रुपये भरले तर तुम्हाला २ लाख रुपयांचा फायदा मिळेल…तुम्हाला केंद्राच्या या योजनेबद्दल माहिती आहे का?

Spread the love

Pradhanmantri Suraksha Bima Yojana (PMSBY)
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना ही विमा योजना राबविण्यात येत आहे.या योजनेच्या माध्यमातून विमा धारक व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास २ लाख रुपयांचा फायदा मिळतो.नैसर्गिक आपत्तींमुळे अपघात,मृत्यू किंवा अपंगत्व हे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत समाविष्ट आहेत.

केंद्र सरकारने या योजनेचा प्रीमियम नुकताच वाढवला आहे तो १२ रुपयांवरून २० रुपये केला आहे.प्रीमियमच्या पेमेंटसाठी ऑटो डेबिट पर्याय उपलब्ध आहे.या योजनेसाठीचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यातून दरवर्षी १ जून ते ६ जूनच्या दरम्यान ऑटो डेबिट पद्धतीने कापला जातो.

१ जून नंतर तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट पद्धतीने पैसे कापले गेल्यास,त्या तारखेपासून विमा योजना लागू केली जाते.सदरच्या योजनेत सामील होण्यासाठी,तुम्ही https://www.jansuraksha.gov.in/FORMS-PMSBY.aspx या वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकता.

हे पण वाचा:- आता 436 रुपयांचा विमा उतरविल्यास मिळणार 2 लाख रुपये!

डाऊनलोड केलेला अर्ज पूर्णपणे भरून तुमचे ज्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आहे तिथे जमा करायचा आहे. अलीकडे काही बँकांनी एसएमएसवर आधारित नोंदणी प्रक्रियाही सुरू केली आहे.नेट बँकिंगद्वारेही या योजनेत सहभागी होता येते.१८ ते ७० वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेत सामील होऊ शकतात.

अनिवासी भारतीय देखील या योजनेत सामील होण्यासाठी पात्र आहेत.परंतु दाव्याच्या वेळी लाभार्थी किंवा नामांकित व्यक्तीला भारतीय चलनात पेमेंट केले जाते.जर कोणताही ग्राहक एकापेक्षा जास्त बँक खात्यांद्वारे योजनेत सामील झाला असेल तर,दाव्याच्या वेळी फक्त एका बँक खात्यात पैसे दिले जातील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment