Infinix Smart 8 :- अलीकडे लोकांमध्ये वाढत चाललेली स्मार्टफोन्स ची क्रेझ लक्षात घेता विविध मोबाईल कंपन्या नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करीत आहेत.अलीकडेच infinix या मोबाईल बनविणाऱ्या कंपनीने Infinix Smart 8 या अँड्रॉइड मोबाईल फोन लाँच केला आहे. अगदी कमी किमतीमध्ये ग्राहकांसाठी हा मोबाईल बाजारात उपलब्ध असणार आहे.फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हा मोबाईल फोन 6,197 रुपयांत उपलब्ध आहे.
Infinix Smart या नव्याने लाँच करण्यात आलेल्या मोबाईल फोन चे काही फिचर्स आपण जाणुन घेणार आहेत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.
Infinix Smart 8 Features and Specifications
कॅमेरा – Infinix Smart 8 या अँड्रॉइड मोबाईल फोन मध्ये 50 मेगा पिक्सेल क्षमतेचा Dual AI Camera बॅक कॅमेरा आणि 8 मेगा पिक्सेल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी – Infinix Smart 8 या मोबाईल फोन मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.त्यामुळे मोबाईल फोनची चार्जिंग बऱ्याच वेळ टिकणार आहे.तसेच परत फास्ट चार्जिंग करण्यासाठी टाइप सी चा चार्जर देखील देण्यात आला आहे.
डिस्प्ले – या मोबाईल फोनमध्ये 6.6 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे जो 90 Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे.तसेच या मोबाइलच्या स्क्रीन चे रिझोल्युशन 720X1612 पिक्सेल आहे.
मॅजिक रिंग – Infinix Smart या मोबाईल फोनमध्ये मॅजिक रिंग दिलेली आहे जी वापरकर्त्यांच्या सोयीसाठी गेम चेंजर आहे.फेस अनलॉक ते बॅकग्राऊंड कॉल,चार्जिंग ॲनीमेशन,चार्ज पूर्ण करण्याचे रिमाइंडर आणि कमी बॅटरी रिमाइंडरपर्यंत मॅजिक रिंग हे स्मार्ट,अधिक अंतर्ज्ञानी स्मार्टफोन अनुभवाचे प्रवेशद्वार आहे.
वॉरंटी – Infinix Smart 8 या मोबाईल फोनला कंपनीकडून हँडसेट साठी 1 वर्षाची वॉरंटी आणि Accessories वरती 6 महिन्यांची वॉरंटी दिलेली आहे.
कलर – Infinix या कंपनीने हा मोबाईल फोन विविध चार कलरमध्ये लॉन्च केला आहे.ज्यामध्ये टिंबर ब्लॅक, शायनी गोल्ड,रेनबो ब्ल्यू आणि गॅलक्सी व्हाईट या कलरचा समावेश होतो.या मोबाईल फोन ची विक्री आजपासून सुरू करण्यात आली आहे.तुम्ही जवळच्या मोबाईल दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन स्टोअर मधून हा मोबाईल फोन खरेदी करू शकता.
Infinix Smart 8 मोबाईल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.